संविधान दिनानिमित्त सामूहिक प्रास्ताविकेचे वाचन व शहिदांना श्रद्धांजली अर्पण
शिक्षण विश्व: भोसरीतील सखुबाई गबाजी गवळी उद्यानात विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

पिंपरी चिंचवड: संविधान दिनानिमित्त अभाविप पिंपरी चिंचवड आणि बापू एमसीसी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सखुबाई गबाजी गवळी उद्यान, भोसरी येथे भारतीय संविधानातील प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी आणि युवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संविधान मूल्यांप्रती आदर व राष्ट्रीय बांधिलकी व्यक्त केली.
कार्यक्रमास बापू एमसीसीचे डायरेक्टर पृथ्वीराज शिंदे तसेच स्वप्निल होरे, रसिका पाटील आणि दिपांशी साटणकर उपस्थित होते. विद्यार्थी अश्विनी शिरसाट आणि ऋतुजा कवठाळे यांच्या मागे सर्वांनी संविधान प्रास्ताविका वाचन केले, ज्यामुळे देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.
हेही वाचा – राज्यातील निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य ठरणार
सामाजिक एकात्मता आणि राष्ट्रीय भावनेचा संदेश
या वेळी 26 नोव्हेंबर 2008 मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवान आणि निष्पाप नागरिकांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संविधाननिष्ठा, सामाजिक एकात्मता आणि राष्ट्रीय भावनेचा संदेश देत हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.




