प्रियदर्शनी स्कूलच्या विद्यार्थ्यांची आयआयटी मुंबईच्या ‘एरोस्पेस’मध्ये सहल!
शिक्षण विश्व: विद्यार्थ्यांनी अनुभवला एरोस्पेसमधील गणित आणि विज्ञानाचा अविष्कार

पिंपरी चिंचवड: आळंदी येथील प्रियदर्शनी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईच्या एरोस्पेस अभियांत्रिकी विभागाला शैक्षणिक भेट दिली. यावेळी गणित आणि विज्ञानाचा अविष्कार तसेच एरोस्पेस तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
प्रियदर्शनी स्कूलच्या इयत्ता ८ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईच्या एरोस्पेस अभियांत्रिकी विभागाला शैक्षणिक भेट देत अविस्मरणीय क्षणांचा अनुभव घेतला.
हेही वाचा – महावितरणकडून शहरात मॉन्सूनपूर्व कामांना वेग
यावेळी विद्यार्थ्यांनी या अत्याधुनिक एरोस्पेस तंत्रज्ञानाचा अविष्कार पहिला. उड्डाणाचे आश्चर्यकारक विज्ञान अनुभवले. विज्ञान व गणित या विषयांचे प्रत्यक्ष जीवनातील महत्त्व समजून घेतले. यावेळी विमानांच्या थरारक प्रात्यक्षिकांमुळे ही सहल विद्यार्थ्यांसाठी अतिशय प्रेरणादायक आणि ज्ञानवर्धक ठरली.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
आयआयटी मुंबईमधील एरोस्पेस अभियांत्रिकी विभागाची ही सहल विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभरासाठी अविस्मरणीय ठरणार आहे. यातून विद्यार्थ्यांना एक नवी पाऊलवाट मिळणार आहे. विद्यार्थ्यांमधील भावी संशोधकांना मोठी स्वप्नं पाहण्याची आणि आकाशाला गवसणी घालण्याची प्रेरणा या सहलीतून मिळाली आहे.
सरिता सिंग
सीईओ, प्रियदर्शनी स्कूल
आळंदी