अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थिनंतर भारत – पाकिस्तानकडून युद्धविरामाची घोषणा
मोदींचा पाकिस्तानला इशारा ‘जर तिकडून गोळी चालली तर भारताकडून तोफगोळे..’

राष्ट्रीय : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थिनंतर अखेर शनिवारी भारत आणि पाकिस्तानकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हेन्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हेन्स यांच्याशी चर्चा करताना पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे. जर पाकिस्तानने पुन्हा भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्याला भारत जोरदार प्रत्युत्तर देईल असं मोदी यांनी म्हटलं आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर व्हेन्स यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याशी आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी देखील चर्चा केली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जेडी वेन्स यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला, त्यांच्याशी चर्चा केली.यावेळी वेन्स यांच्याशी बोलताना मोदी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे, जर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना कठोर प्रत्युत्तर देऊ असं मोदी यांनी म्हटलं आहे. दरम्यान जर पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं नाही तर आम्ही देखील संयम राखू असंही यावेळी भारताच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान वेन्स यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी देखील यावेळी चर्चा केली.
हेही वाचा – महावितरणकडून शहरात मॉन्सूनपूर्व कामांना वेग
भारतानं आपल्या अटींवर युद्धविरामाची घोषणा केली आहे, युद्धविरामाची घोषणा करतानाच पाकिस्तानला इशारा देण्यात आला आहे. जर पाकिस्तानने युद्धविरामाचं उल्लंघन केलं तर त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर दिलं जाईल असं भारताच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम व्हावा यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली, ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली, युद्धविरामाच्या घोषणेनंतर ट्रम्प यांनी दोन्ही देशांचं अभिनंदन केलं आहे. भारतानं दहशतवादाविरोधात देखील कठोर भूमिका घेतली आहे, दहशतवादासंदर्भात कोणतीही तडजोड होणार नाही असा इशाराही पाकिस्तानला देण्यात आला आहे.