ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

राज्यस्तरीय मूल्यांकन प्रक्रियेत प्रतिभा ज्युनिअर कॉलेजला ‘अ प्लस +’ श्रेणी

शिक्षण विश्व: पिंपरी-चिंचवडमधील एकमेव कनिष्ठ महाविद्यालय

पिंपरी-चिंचवड | महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या वतीने नियुक्त तज्ज्ञ समितीमार्फत (२०२४–२०२५) राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे काटेकोर मूल्यमापन करण्यात आले. या प्रक्रियेत संपूर्ण महाराष्ट्रातून १,०२,६७५ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी केवळ ४२९ संस्थांना ‘अ प्लस +’ श्रेणी बहाल करण्यात आली आहे.

या गौरवशाली यादीत चिंचवड येथील प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचा समावेश झाला असून, पिंपरी-चिंचवड शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांपैकी ‘अ प्लस +’ श्रेणी मिळवणारे हे एकमेव स्वयंअर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालय ठरले आहे. राज्यस्तरीय ‘शाळा गुणवत्ता व मूल्यांकन व आश्वासक आराखडा’ प्रक्रियेत महाविद्यालयाने ही उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.

शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासनिक कार्यक्षमता, विद्यार्थी प्रगती, नवोपक्रम, पायाभूत सुविधा, शिक्षकांची गुणवत्ता आणि सामाजिक जबाबदारी अशा विविध निकषांवर संस्थांचे मूल्यमापन करण्यात आले. या सर्व निकषांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत प्रतिभा ज्युनिअर कॉलेजने शैक्षणिक गुणवत्तेचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे.

हेही वाचा      :            भाजपा पक्ष नसून एक छळ छावणी; खासदार संजय राऊतांचा घणाघात

ही कामगिरी केवळ संस्थेसाठीच नव्हे, तर संपूर्ण चिंचवड परिसरासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी ठरली आहे. या यशामागे प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा प्रतिभा शहा, संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांचे मार्गदर्शन, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समर्पित कार्य, विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण प्रगती तसेच पालकांचा सक्रिय सहभाग यांचा मोलाचा वाटा आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्तबद्ध व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि मूल्याधिष्ठित शिक्षणपद्धती यामुळे महाविद्यालयाने राज्यपातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या यशाबद्दल प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सचिव डॉ. दीपक शहा, संचालक डॉ. तेजल शहा व खजिनदार डॉ. भूपाली शहा यांनी प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. “ही घवघवीत कामगिरी भविष्यातील शैक्षणिक प्रगतीसाठी भक्कम पायाभरणी ठरेल. येणाऱ्या काळातही प्रतिभा ज्युनिअर कॉलेज शैक्षणिक उत्कृष्टतेचा आदर्श निर्माण करेल,” असा विश्वास संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांनी व्यक्त केला.

“‘अ प्लस +’ ही केवळ श्रेणी नसून आमच्या सातत्यपूर्ण गुणवत्तावर्धन, शैक्षणिक बांधिलकी आणि मूल्याधिष्ठित शिक्षणपद्धतीची राज्यस्तरीय पावती आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि सक्षम शिक्षकवर्गाच्या बळावर आम्ही उत्कृष्टतेची ही परंपरा अधिक बळकट करू. भविष्यातही प्रतिभा ज्युनिअर कॉलेज राज्यात आदर्श शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाईल, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

– डॉ. दीपक शहा, सचिव, प्रतिभा ज्युनिअर कॉलेज.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button