Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

भाजपा पक्ष नसून एक छळ छावणी; खासदार संजय राऊतांचा घणाघात

मुंबई | काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना पिस्तूल दाखवून मारहाण झाल्याच्या घटनेवरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. दुसऱ्या एखाद्या राज्यात किंवा भाजपा शिवाय इतर पक्षाकडून अशी घटना घडली असती तर काय झालं असतं? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. गळ्यात एखादं उपरणं घालून, हिंदुत्वाच्या नावाखाली हे प्रकार सुरु असल्याचा घणाघात राऊतांनी केला.

लोकशाहीत प्रत्येकाला मतं मांडण्याचा अधिकार असल्याचे संजय राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि नरेंद्र मोदींना लोकशाहीची थोडीजरी चाड असेल तर त्यांनी याप्रकरणात लक्ष घालायला हवं. काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना पिस्तूल दाखवून मारहाण झाल्याच्या घटनेवरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

हेही वाचा      :                पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मन की बात’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण उत्साहात

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांचं कवडीचे योगदान नाही, देश किंवा सामाजिक रचना घडविण्यात ज्यांचं योगदान नाही, त्यांच्याकडून विचारांची अपेक्षा काय करणार? असेही राऊत म्हणाले.

अजित पवार, हसन मुश्रीफ किंवा नवाब मलिक स्वत:च्या इच्छेने भाजपाच्या वळचनीला गेले नाहीत. संपत्ती आणि तुरुंगवास टाळण्यासाठी ते भाजपाबरोबर गेले. फडणवीसांनी चक्की पिसींग पिसींग विधान अजित पवार यांच्याबाबतच केले होते. भाजपा पक्ष नसून एक छळ छावणी असल्याची जहरी टीका राऊतांनी यावेळी केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button