Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

भाजपची नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर; रविंद्र चव्हाणांची घोषणा

मुंबई | राज्यातील विविध निवडणुका पार पडल्यानंतर भाजपने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल केले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली.

या नव्या कार्यकारिणीत अनेक जुन्या पदाधिकाऱ्यांना बढती देण्यात आली असून काही नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. आतापर्यंत मुख्य प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळणारे केशव उपाध्ये यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी नवनाथ बन यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन नव्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे. ही कार्यकारिणी निवडणुकीनंतर जाहीर करण्याचे आधीच ठरले होते. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता सक्षम असून, ज्यांना या यादीत स्थान मिळालेले नाही. त्यांना आगामी काळात संघटनेच्या इतर कामात सामावून घेतले जाईल, अशी माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली.

भाजप पदाधिकाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे :

भाजप प्रदेश उपाध्यक्ष

अतुल काळसेकर
भारती पवार
संजय कोरगे
संजय भेंडे
रामदास कडस
केशव उपाध्ये
गोपीचंद पडळकर
प्रिया शिंदे
सुजय विखे पाटील
अर्चना पाटील चाकूरकर

कोषाध्यक्ष

मिहिर कोटेचा

महिला मोर्चा अध्यक्ष

चित्रा वाघ

हेही वाचा    :            भाजपा पक्ष नसून एक छळ छावणी; खासदार संजय राऊतांचा घणाघात 

युवा मोर्चा अध्यक्ष

कृष्णराज महाडिक

ओबीसी मोर्चा अध्यक्ष

योगेश टिळेकर

मुख्य प्रवक्ता

नवनाथ बन

सरचिटणीस

निरंजन डावखरे
संजय कुटे
माधवी नाईक
राजेश पांडे
सुनिल राणे
योगेश सागर

चिटणीस

मंगश चव्हाण
संजय कुटे
परिणय फुके
वर्षा डहाळे
संजय जगताप
अर्चना डेहणकर
रोहिणी नायडू
राम सातपुते
प्रवीण घुगे
रेखा कुलकर्णी
भैरवी घाक

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button