Pimpri-chinchwad: औद्योगिक सुरक्षा सप्ताह स्पर्धात 65 कंपन्यातील 516 स्पर्धकांचा सहभाग
उद्योग विश्व : क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे चॅप्टरचा पुढाकार

पिंपरी-चिंचवड: क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे चॅप्टरच्या वतीने औद्योगिक सुरक्षा सप्ताह 2025 स्पर्धा क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर, भोसरी येथे संपन्न झाली. त्यात कंपन्यानी उस्फुर्त सहभाग नोंदविला.
यात 65 कंपन्यामधील 516 स्पर्धक सहभागी झाले. एकूण 268 नामांकनं प्राप्त झाली, त्यामध्ये 74 केस स्टडीज, 22 नाट्य सादरीकरणे, 108 पोस्टर्स आणि 64 घोषवाक्ये यांचा समावेश होता.
या स्पर्धेचे उद्घाटन मुख्य अतिथी शिवराज पाटील (मुख्य कार्यकारी अधिकारी, मिंडा कॉर्पोरेशन लि. – डाय कास्टिंग विभाग) यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या संचालिका डॉ. रजनी इंदुलकर, तसेच पुणे चॅप्टरचे कौन्सिल सदस्य माधव बोरवणकर, अनंत क्षीरसागर आणि भूपेश मॉल उपस्थित होते .
समारोप सत्रात मुख्य अतिथी प्रसाद फुलगिरकर (हेड, ॲक्सल आणि गिअर फॅक्टरी, टाटा मोटर्स लि., टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल, पुणे) होते. त्याच्यासमवेत पारितोषिक वितरण प्रसाद फुलगिरकर, क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या संचालिका डॉ. रजनी इंदुलकर, तसेच पुणे चॅप्टर कौन्सिल सदस्य माधव बोरवणकर, अनंत क्षीरसागर, धनंजय वाघोलिकर, श्रीमती. परवीन तरफदार आणि भूपेश मॉल तसेच या स्पर्धेचे परीक्षकांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्याना सुवर्ण , रजत , व कास्य स्वरूपात स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भूपेश मॉल यांनी केले, तर प्रशांत बोराटे आणि चंद्रशेखर रुमाले यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले.
हेही वाचा: SBI च्या खातेधारकांसाठी महत्त्वाची माहिती, ‘या’ स्मार्टफोन्समध्ये वापरता येणार नाही YONO अॅप
सुरक्षा सप्ताह स्पर्धेत सहभागी झालेल्या काही प्रमुख कंपन्या:
टाटा मोटर्स, टाटा ऑटोकॉम्प ग्रुप कंपन्या, फोर्ब्स मार्शल, आयएसी इंटरनॅशनल, एडीएम जॉइनफ्लेक्स, बॉश, सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, माहले आनंद, महिंद्रा, मिंडा ग्रुप, एस के एफ ,सुल्झर इंडिया लि., सुब्रोस, सुजान कॉन्टिटेक एव्हीएस , टीकेआयएल इंडस्ट्रीज प्रा. लि., टाक्शी ऑटो, व्हिजन टेक इंजिनिअरिंग, झेडएफ इंडिया यांचा समावेश होता.कार्यक्रमाचे परीक्षण अमोल कापडनीस, अनंत चिंचोळकर, अनंत क्षीरसागर, बाळासाहेब घुले, चंद्रशेखर बापट, धनंजय वाघोळिकर, देबाशीष पॉल, माधव बोरवणकर, महादेव लोहार, मनीष फाळे, परवीन ताराफदार, प्रशांत मुदलवडकर, राकेश पांडे, श्रीधर राव, विष्णू पाटील, विठ्ठल वाघचूरे आणि भूपेश मॉल यांनी केले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा