Breaking-newsउद्योग विश्व । व्यापारटेक -तंत्र । उद्योग । व्यापारमहाराष्ट्र

SBI च्या खातेधारकांसाठी महत्त्वाची माहिती, ‘या’ स्मार्टफोन्समध्ये वापरता येणार नाही YONO अ‍ॅप

SBI YONO App :  भारतातील सर्वात मोठ्या बँकेपैकी एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेधारकांची संख्या प्रचंड मोठी आहे. एसबीआयचे खातेदार बँकेशी संबंधित कोणतेही काम करायचे असल्यास YONO App वापरतात. YONO अ‍ॅपमुळे बँकेच्या खातेधारकांना एका क्लिकवर अनेक कामे करणे शक्य होते. मात्र, आता काही स्मार्टफोन्समध्ये हे अ‍ॅप वापरता येणार नाही.

यापुढे Android 11 आणि त्यापेक्षा जुने व्हर्जन असलेल्या स्मार्टफोन्समध्ये YONO अ‍ॅप वापरता येणार नाही. त्यामुळे जे खातेधारक जुन्या स्मार्टफोन्समध्ये YONO अ‍ॅपचा वापर करतात, त्यांना यापुढे या सेवेचा लाभ घेता येणार नाही.

हेही वाचा –  ‘पर्यावरणाचा ऱ्हास होणारे कोणतेही प्रकल्प कोकणात येणार नाही’; उपमुख्यमंत्री अजित पवार

Android 11 आणि त्यापेक्षा जुने व्हर्जन असलेल्या स्मार्टफोन्समध्ये YONO अ‍ॅप बंद करण्याचे प्रमुख कारण सुरक्षा हे आहे. जुन्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये अनेकदा त्रुटी असतात. जुनी ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या फोनला सिक्युरिटी अपडेट्स देखील मिळत नाही. त्यामुळे यूजर्सची खासगी माहिती चोरी होण्याची शक्यता असते. त्यामुळे एसबीआयने या अँड्राइड व्हर्जन असलेल्या फोन्समध्ये YONO अ‍ॅप बंद करण्याचा निर्णय घेतला.

आता YONO App वापरण्यासाठी यूजर्सकडे अँड्राइड 12 व त्या पुढील व्हर्जन असलेले स्मार्टफोन्स असणे आवश्यक आहे. Samsung Galaxy S21 Ultra 5G, Samsung Galaxy S20 5G, Google Pixel 4, Samsung Galaxy Note 20 Ultra 5G, OnePlus 8 Pro, OnePlus 9 Pro आणि POCO X3 Pro सह अनेक स्मार्टफोन्स अँड्राइड 11 वर चालतात. यापुढे या स्मार्टफोन्समध्ये योनो अ‍ॅपचा वापर करता येणार नाही.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button