Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालिकेच्‍या जलतरण तलावांवर ठेकेदारांचा ताबा

पिंपरी :  शहरात उन्हाचा कडाका वाढत असल्‍याने जलतरण तलावांवर पोहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. मात्र, महापालिकेच्या जलतरण तलावांवर सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महापालिकेच्या १३ जलतरण तलावांपैकी १० तलाव ठेकेदारांच्या ताब्यात असून दोन तलाव दुरुस्तीच्या कामामुळे बंद आहेत. तिकीट बुकींगसाठी वेगवेगळ्या वेबसाइट, मासिक पास देण्यास टाळाटाळ, बॅचबाबत ठेकेदारांची मनमानी यामुळे पोहण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

शहरात पालिकेचे १३ तलाव आहेत. त्यापैकी आकुर्डी प्राधिकरण व मोहननगर हे दोन तलाव दुरुस्तीच्या कामामुळे बंद आहेत. केशवनगरचा एक तलाव पालिकेकडून संचलित केला जातो. मात्र, इतर १० सार्वजनिक जलतरण तलावांचे व्यवस्थापन ठेकेदारांमार्फत केले जाते. तीन वर्षांसाठी ते चालविण्यास दिलेले आहेत. यामध्ये ठेकेदार तिकीट विक्री, स्वच्छता, सुरक्षा आणि पाणी शुद्धीकरण यांसारखी कामे ठेकेदार पाहणार आहेत. त्यांच्यावर महापालिका देखरेख करणार आहे. यामुळे महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांची बचत होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.

हेही वाचा –  घरं पाडली त्यांना १० लाख भरपाई द्या; सर्वोच्च न्यायालयाचा युपी सरकारला दणका

मात्र, ठेकेदारांकडून महापालिकेच्या नियमांना धाब्यावर बसवण्याचे काम केले जात आहे. बहुतांश ठिकाणी शॉवर बंद असतात. अस्वच्छता असते. तिकिट बुकींग करताना अडचणींचा सामना करावा लागतो. जलतरण तलावासाठी ऑनलाइन तिकीट बुक करताना पालिकेच्या संकेतस्थळावरून एका आयडीवरून तीन तिकिटे बुक करता येतात. तसेच, ऑनलाइन पासही काढता येत होता.

मात्र, ठेकेदारांच्या संकेतस्थळावरून एकच तिकीट बुक होत असून पासधारकांसाठी ऑनलाइनची सुविधा उपलब्ध नाही. नागरिकांना दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या पध्दतीने लॉगिन करावे लागते. मासिक पास देण्यास टाळाटाळ केली जाते. बॅचबाबत संस्थांची मनमानी केली जाते. पाऊण तासावरून अर्ध्या तासाचीच बॅच अनेक ठिकाणी आहे. ठेकेदारांकडून नागरिकांची गैरसोय केली जात असून याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

अनेक ठेकेदार जलतरण तलावावर खासगी स्विमिंग क्लास घेतात. त्याचे शुल्क २ हजार रुपयांपासून १५ हजार रुपयांपर्यंत आहे. ठेकेदार महापालिकेच्या जलतरण तलावांचा वापर करून पैसा कमावत आहे. मात्र, यामुळे पोहण्यासाठी जाणार्‍या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्यानंर विद्यार्थ्यांची पोहण्यासाठी संख्या वाढते. असुविधांमुळे पालक व विद्यार्थी यांचा हिरेमोड होत आहे.

महापालिकेने ठेकेदारांना संचलित करण्यासाठी दहा जलतरण तलाव दिले. त्यामध्ये एच २ ओ टेक्नो संस्थेकडे संभाजीनगर, वडमुखवाडी, यमुनानगर, पिंपळे गुरव, अवधूत फडतरे यांच्याकडे पिंपरीगाव, सांगवी, कासारवाडी, भोसरी, हर्षवर्धन डेव्हलपर्सकडे थेरगाव आणि एच २ ओ एक्वाकडे नेहरूनगर तलावाचे व्यवस्थापन सोपविण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

महापालिकेने ठरवून दिलेले दर आकारण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. खासगी ठेकेदारांना चालवण्यासाठी दिलेल्या जलतरण तलावांची वेबसाइट वेगळी आहे. तिथे तिकीट बुक करण्यासाठी प्रक्रिया सुलभ करण्याच्या सूचना ठेकेदारांना दिल्या आहेत.

पंकज पाटील, सहायक आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button