ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

आकुर्डीच्या डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा डंका

'बेस्ट पेपर अवॉर्ड'ने सन्मानित : पुण्यात आंतरराष्ट्रीय परिषदेत कामगिरी

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमधील नामांकित डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आकुर्डी येथील सिव्हिल अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील वाघोली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत आपल्या संशोधनाचा ठसा उमटवला आहे. या परिषदेत विद्यार्थ्यांच्या संशोधन निबंधाला मानाचा ‘बेस्ट पेपर अवॉर्ड’ देऊन गौरवण्यात आले.

पुणे येथील जेएसपीएम विद्यापीठ, वाघोली येथे १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत जगभरातील संशोधक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

हेही वाचा     :              कौशल्यम लाईटहाऊस सारख्या प्रकल्पामुळे युवकांना रोजगाराच्या नव्या संधी; महापौर रवि लांडगे

​सिव्हिल अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी साद अन्सारी, अनिकेत जैस्वाल आणि दिलीप जट यांनी या परिषदेत सहभाग घेतला. त्यांनी “संरचनांमध्ये कंपन नियंत्रणासाठी ट्यूनड मास डॅम्पर (TMD) चे डिझाइन व विश्लेषण” या विषयावर आपले संशोधन सादर केले. इमारती आणि पुलांसारख्या मोठ्या वास्तूंमधील कंपने नियंत्रित करण्यासाठी ट्यूनड मास डॅम्परचे महत्त्व आणि त्याचे तांत्रिक विश्लेषण त्यांनी प्रभावीपणे मांडले. त्यांच्या या नाविन्यपूर्ण सादरीकरणाची दखल घेत परीक्षकांनी त्यांना सर्वोत्कृष्ट निबंधाचा पुरस्कार जाहीर केला.
​या संशोधनासाठी विद्यार्थ्यांना सिव्हिल अभियांत्रिकी विभागाच्या प्रा. स्नेहा सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे:

​चेअरमन: सतेज पाटील,​विश्वस्त: तेजस पाटील ​संचालक: रियर अॅडमिरल अमित विक्रम (नि.),​प्राचार्या: डॉ. पी. मालती, ​विभागप्रमुख: डॉ. अशोक मोरे ​या सर्वांनी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक प्रा. स्नेहा सावंत यांचे विशेष अभिनंदन केले आहे. आकुर्डी परिसरासह शैक्षणिक क्षेत्रातून या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

“आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘बेस्ट पेपर अवॉर्ड’ मिळवणे, ही संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची वृत्ती जोपासणे आणि त्यांना जागतिक दर्जाच्या व्यासपीठावर संधी उपलब्ध करून देणे, हे आमचे नेहमीच उद्दिष्ट राहिले आहे. साद, अनिकेत आणि दिलीप यांनी मांडलेले हे संशोधन सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी उपयुक्त ठरेल. या यशाबद्दल विद्यार्थी आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे मी मनापासून अभिनंदन करतो.”

– सतेज पाटील (चेअरमन)

​”केवळ पदवी मिळवणे हा शिक्षणाचा उद्देश नसून, प्राप्त ज्ञानाचा उपयोग नाविन्यपूर्ण संशोधनासाठी करणे आवश्यक आहे. संरचनांच्या सुरक्षेसाठी आमच्या विद्यार्थ्यांनी ट्यूनड मास डॅम्परवर केलेले संशोधन तांत्रिकदृष्ट्या प्रगत आहे. अशा प्रकारच्या यशांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना अधिक चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहन मिळते. विद्यार्थ्यांच्या या यशात संपूर्ण सिव्हिल अभियांत्रिकी विभागाच्या मेहनतीचा मोठा वाटा आहे.”

– रियर अॅडमिरल अमित विक्रम (नि.) (संचालक)

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button