खासदार अमोल कोल्हे यांना ठाकरी शैलीत जोडे!
अंबादास दानवे यांनी खासदार कोल्हे यांच्या वक्तव्याची हवा काढली
पिंपरी : संघटनेत २०-३० वर्षे झिजावे लागते हे खासदार अमोल कोल्हे यांना माहित नाही.“अमोल कोल्हे हे हवेवर निवडून येणारे खासदार आहेत. अशा शब्दात विधान परिषदेचे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ज्यांनी ठाकरे शैलीमध्ये कोल्हे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
अमोल कोल्हे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात काँग्रेस आणि शिवसेनेवर वक्तव्य केले होते, “विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही, तर, दुसऱ्या बाजूला शिवसेना (ठाकरे) अजूनही झोपेतून जागी झालेली नाही. राज्यात मित्र पक्षांच्या अशा वागण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या आपल्या पक्षाला विरोधी पक्ष म्हणून वाढण्यासाठी मोठी जागा व संधी आहे. खरंतर, पराभव हा आधी मनात होतो आणि त्यानंतर रणांगणात होतो, त्यामुळे मरगळ झटका आणि कामाला लागा. तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत”. कोल्हे यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेत्यांनी व शिवसेनेच्या (ठाकरे) नेत्यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, “अमोल कोल्हे हे हवेवर निवडून येणारे खासदार आहेत. संघटनेत २०-३० वर्षे झिजावं लागतं ते त्यांना माहित नाही. मविआबद्दल त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. एखादा परभव आणि विजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आघाडीत बिघाडी कुठेही नाही. निवडणूक आली की विजय पराजय होतो. माविआ फुटणार नाही
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने महाविकास आघाडीची एकजूट व ताकद पाहिली. मात्र महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं. त्यानंतर आता मविआमध्ये धुसफूस चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. मविआमधील सर्वच पक्ष व त्यांचे नेते आता एकमेकांवर टीका करत आहेत. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा देत आहेत. “लोकसभेनंतर आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या”, असं म्हणत काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी मविआला घरचा आहेर दिला आहे. तर, शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढू शकतो असं म्हटलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मविआतील मित्रपक्षांना टोला लगावला. मात्र यामुळे खासदार कोल्हे चांगलेच अडचणीत आले आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेकडून कोल्हे यांच्यावर पलटवार होत असून दानवे यांनी खास ठाकरे शैलीमध्ये कोल्हे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.




