ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

शरद पवार यांचे दगाफटकाचे राजकारण जमिनीत गाडले : अमित शहा

शिर्डीच्या अधिवेशनात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

– देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक; स्थिर सरकार दिल्याबद्दल मानले आभार

– उद्धव ठाकरेंच्या दगाफटक्याला कार्यकर्त्यांनी जागा दाखवली

शिर्डी : १९७८ पासून शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण सुरू केलं होतं, त्याला २० फूट जमिनीत गाडण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलं. उद्धव ठाकरेंनी द्रोह केला, २०१९ ला विचारधारा सोडली. बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांताला सोडलं होतं. दगाफटका करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले होते, त्यांना तुम्ही त्यांची जागा दाखवली.” अशा शब्दात भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.

भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे.यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला केला.या अधिवेशनाला ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नेते नितीनजी गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब,नवनिर्वाचित कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण तसेच प्रमुख नेते,पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत.

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहत कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्ष शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षावरही निशाणा साधला.

अमित शहा म्हणाले, “महाराष्ट्राच्या महाविजयानंतर आपण पहिल्यांदा एकत्र आलो आहेत. तुम्ही (कार्यकर्त्यांनी) किती मोठं काम केलंय याची तुम्हाला कल्पना नाही. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनले. अनेक कार्यकर्ते आमदार आणि मंत्री झाले. १९७८ पासून शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण सुरू केलं होतं, त्याला २० फूट जमिनीत गाडण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलं. उद्धव ठाकरेंनी द्रोह केला, २०१९ ला विचारधारा सोडली. बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांताला सोडलं होतं. दगफटका करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले होते, त्यांना तुम्ही त्यांची जागा दाखवली.”

“१९७८ ते २०२४ महाराष्ट्रात अस्थिरतेची स्थिती होती. अस्थितरता सोडून स्थिर राष्ट्र बनवण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. लोकसभेनंतर आमचा विजय होईल, असं विरोधकांचा स्वप्न होतं. पण त्यांच्या स्वप्नांचा चुराडा करण्याचं काम तुम्ही केलं. काही निवडणुका अशा असतात की त्या देशाचं राजकारण बदलतात. महाराष्ट्राचे शिल्पकार भारताचे जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत”, असंही अमित शाह म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button