एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, आळंदी यांच्या वतीने उन्नत भारत अभियान अंतर्गत ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी डिजिटल साक्षरतेचा उपक्रम; ठाकरवाडी येथे जनजागृती कार्यक्रम संपन्न

पिंपरी : ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी डिजिटल साक्षरतेचा उपक्रम; ठाकरवाडी येथे जनजागृती कार्यक्रम संपन्न आळंदी : एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, आळंदी यांच्या वतीने उन्नत भारत अभियान अंतर्गत जिल्हा
परिषद प्राथमिक शाळा, ठाकरवाडी (चऱ्होली खुर्द) येथे इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी डिजिटल साक्षरता जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना संगणक व मोबाईलचा मूलभूत वापर, इंटरनेटचा सुरक्षित वापर तसेच शिक्षणामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली. प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डिजिटल साधनांचा वापर समजावून सांगण्यात आला. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. वाफरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच उपसंचालक डॉ. मानसी अतितकर व डॉ. अक्षदा कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.
हेही वाचा – “कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर स्टॉलसकट उखडून टाका”; नितेश राणेंचं मोठं वक्तव्य

कार्यक्रमासाठी उन्नत भारत अभियान समन्वयक डॉ. श्रीराम कर्गावकर, फॅकल्टी समन्वयक श्री. हनुमंत मावकर व डॉ. ऋतुजा देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी स्वयंसेवक प्रसाद ठीकेकर, वैष्णवी कांबळे, सायली मडणे, गणेश गुंथाळ, गिरीश चव्हाण, आकाश भाड व गौरव माने यांनी सक्रिय सहभाग घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजेश कांबळे यांनी महाविद्यालयाचे व सर्व स्वयंसेवकांचे आभार मानले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी असे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.





