Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे हादरलं! मुलीशी बोलण्याच्या कारणावरून तरुणाची हत्या; कोथरूडमध्ये दहा जणांना अटक

पुणे | शहरातील कोथरूड परिसरात मुलीशी बोलण्याच्या कारणावरून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक केली आहे. मृत तरुणाचे नाव नागेश संजय जाधव (वय २३, रा. सर्वे नं. १००१, जुनी वडारवाडी, मंगळाकर चौक, कर्वे हॉस्पिटलसमोर, वडारवाडी, शिवाजीनगर, पुणे) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश जाधव आणि एका अल्पवयीन मुलीची ओळख होती व दोघांमध्ये मैत्री होती. या मैत्रीवरून वाद निर्माण झाला. तक्रारदार सुरेखा संजय जाधव (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी नागेशला एका मोबाईलवरून फोन आला. त्यानंतर तो घराबाहेर गेला. काही वेळाने पुन्हा फोन करून त्याला कोथरूड येथील एसएनडीटी परिसरात बोलावण्यात आले. तेथे आरोपींनी नागेशला पकडून लाकडी दांडक्यांनी तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असा आरोप आहे. गंभीर जखमी अवस्थेत नागेशला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा    :                “शिर्डीत प्रसादाचा एकच लाडू”; इंधन टंचाईवरून संजय राऊत यांची मोदींवर बोचरी टीका

या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३, ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(२), १९० तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बबली अनिल शिंदे, सुनीता सुनील शिंदे, जयश्री लक्ष्मण शिंदे, बबली योगेश शिंदे, गंगा संजय पवार, माणिक संजय पवार, सुनील शिंदे, पप्पू शिंदे, योगेश शिंदे आणि अनिल शिंदे (सर्व रा. मेगासिटी, एसएनडीटीजवळ, कोथरूड, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास कोथरूड पोलीस करत असून सर्व आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button