ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणे

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ जुलैला पुणे-बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धा

२० जुलैला पत्रकार भवनात पत्रकार परिषद; स्पर्धेच्या आयोजनाची सविस्तर माहिती दिली जाणार

पुणे | प्रतिनिधी

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे-बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी होणार असून, देशभरातील तसेच राज्यातील आघाडीचे सायकलपटू या स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा राष्ट्रीय दर्जाची असून, महाराष्ट्रातील सायकलिंगला प्रोत्साहन देण्याबरोबरच नवोदित खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.

पुणे ते बारामती या मार्गावर होणाऱ्या या स्पर्धेत विविध गटांतील सायकलपटू सहभागी होणार असून, स्पर्धेचे आयोजन आंतरराष्ट्रीय निकषांनुसार करण्यात येणार आहे. खेळाडूंसाठी आवश्यक सुविधा, सुरक्षिततेचे नियोजन आणि स्पर्धेचे व्यवस्थापन याबाबतही विशेष काळजी घेण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

हेही वाचा –  वृक्षवल्ली’ उपक्रमातून एमआयटी आळंदीच्या विद्यार्थ्यांकडून ७०० जांभूळ वृक्षांचे रोपन

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाला अभिवादन करण्याबरोबरच युवकांमध्ये सायकलिंगची आवड वाढविणे, आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करणे आणि स्पर्धात्मक क्रीडा संस्कृतीला चालना देणे हा या स्पर्धेच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

२० जुलै रोजी पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन

या स्पर्धेच्या अनुषंगाने सोमवार, दि. २० जुलै २०२६ रोजी दुपारी १२.०० ते १.०० या वेळेत पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत संस्थेचे पदाधिकारी स्पर्धेची संपूर्ण रूपरेषा, सहभागी खेळाडू, स्पर्धेचा मार्ग, नियमावली तसेच आयोजनासंदर्भातील सविस्तर माहिती देणार आहेत. त्यासाठी सर्व पत्रकार बंधू भगिनींनी पत्रकार परिषदेसाठी सकाळी ११.४५ वाजता पत्रकार भवन येथे उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button