Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

“कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर स्टॉलसकट उखडून टाका”; नितेश राणेंचं मोठं वक्तव्य

Nitesh Rane : राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे हिंदूत्ववादी नेते असून, यासंदर्भात वक्तव्य करत असतात. सरकार हिंदूत्व असल्याचे ते म्हणत असतात. अशातच त्यांनी नाशिकमध्ये होत असलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एक मोठं वक्तव्य केले आहे.

कुंभमेळ्याच्या निमित्ताने कोणीही हिंदूंशिवाय दुकाने लावणार नाही. कोणी इथे स्टॉल लावण्यासाठी आले तर स्टॉलसकट उखडून टाका, आम्ही मंत्रालयात बसलो आहोत. असे वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे. हिंदू हित रक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, हिंदूंनी हिंदूंकडून खरेदी केली पाहिजे, ही संकल्पना ज्यांनी मांडली त्यांचे मी स्वागत करतो. मी खारघरला अशीच भूमिका मांडली. आजूबाजूला जिहादी लोकांची दुकानं होती. तेव्हा मी बोललो, नंतर माध्यमांनी मला झोड-झोड झोडले. पण मला तेव्हाही काही वाटले नाही आता ही काही वाटत नाही. असे म्हणत त्यांनी आपल्या भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.

हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंबाबत नाही बोलायचे का? मग पाकिस्तान, इस्लामाबाद विषयी बोलणार का? आम्ही धर्माधर्मात भांडणे लावतो असे म्हणतात. ते जे बोलतात त्यांनी येऊन सांगावे. असे टीका करणाऱ्यांना त्यांनी सूचित केले आहे. आता कुंभमेळ्याची कामे जोरात सुरू असल्याचे सांगत तुमच्या मागण्या सरकारकडे देतो, असे आश्वासन नितेश राणेंनी दिले.

हेही वाचा –  वैद्यकीयच्या जागांत मोठी वाढ! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षांची घोषणा…

कुंभमेळ्यात एकही जिहादी आला नाही पाहिजे. त्याला धाक, भीती वाटली पाहिजे. मी मागे त्र्यंबकेश्वरमध्ये गेलो होतो, तिथे दुकानावर नाव वेगळे होते. आतमध्ये अब्दूल बसलेला होता. त्यांना आता विषय कळला आहे. आम्ही आता देशात कार्यक्रम सुरू करणार आहोत की, हिंदूंनी हिंदूंकडूनच वस्तू घेतल्या पाहिजे. मी इथे आमदार, मंत्री म्हणून नाही तर हिंदू म्हणून आलो आहे, असेही देखील नितेश राणे म्हणाले आहेत.

कोणी इथे स्टॉल लावण्यासाठी आले तर स्टॉलसकट उखडून टाका, असा इशारा देत आम्ही मंत्रालयात बसलो आहोत. धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आमच्या राज्यात सर्वात कडक लव्ह जिहादचा कायदा असेल. हे सरकार हिंदू समाजाने निवडून दिले आहे. आम्ही काही मोहल्ल्यात जाऊन मत मागितले नाही, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.

नाशिकमध्ये जय श्रीरामच ऐकू येणार. इथे आय लव्ह मोहम्मद ऐकू येणार नाही, असे देखील ते म्हणाले.

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी राज्य सरकारकडून केली जात आहे. या मेळाव्यासाठी नाशिकमध्ये देशभरातून लाखो साधू, संत आणि भाविक येणार आहेत. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या तपोवनमध्ये वृक्ष तोडीला सुरुवात झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button