‘पुणे जिल्ह्यांचे विभाजन झाल्यास नव्याने शिवनेरी जिल्हा निर्माण करावा’; आमदार महेश लांडगे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मागणी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे भूमिपूजन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/pune-24-780x470.jpg)
पिंपरी- चिंचवड : गेल्या अनेक दिवसांपासून विविध माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचे विभाजन होणार असल्याचे चर्चा सुरू आहे बातम्या कानांवर येत आहेत. त्यामुळे असा काही निर्णय झाल्यास नव्याने शिवनेरी जिल्ह्याची निर्मिती व्हावी अशी मागणी भाजप नेते तथा भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
चिखली येथे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार योगेश कदम, विजय शिवतरे,अण्णा बनसोडे, शंकर जगताप ,बापूसाहेब पठारे, शरद सोनवणे, बाबाजी काळे आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे भूमिपूजन भोसरी मतदारसंघात येणाऱ्या चिखली भागात करण्यात आले या निमित्ताने बोलत असताना भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे म्हणाले, आज खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड शहराची स्वतंत्र ओळख रुजली जात आहे. पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून शहराचा नावलौकिक वाढणार आहे. शहरातील गुन्हेगारी थोपवणे, भयमुक्त वातावरण शहरात असण्याबरोबरच महिलांना सुरक्षा देणे या दृष्टिकोनातून पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र आयुक्तालय असावे याची मागणी आपण मुख्यमंत्री असताना केली. त्यावेळी आपण पोलीस आयुक्तालयासाठी मंजुरी दिली आणि आज मुख्यमंत्री असताना आपल्या हस्ते याचे भूमिपूजन होत आहे याचा मनस्वी आनंद आहे. 2017- 18 मध्ये माझे महापौर नितीन काळजी यांच्या कार्यकाळात दिव्यांग भवन उभारण्याचा निर्णय झाला. आज राज्यातील आगळे वेगळे दिव्यांग भवन पिंपरी चिंचवड शहरात आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची पर्यावरण पूरक अशी सुसज्ज इमारत देखील उभारणार असून हे पोलीस आयुक्तालय देखील राज्यातील आदर्शवत पोलीस आयुक्तालय ठरेल. पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून नव्याने आणि स्वतंत्र असे अस्तित्व पिंपरी चिंचवड शहराचे निर्माण होत आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लहानपणीचे स्वप्न अखेर पूर्ण झाले!
महेश लांडगे पुढे म्हणाले गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यांचे विभाजन होणार असल्याची चर्चा कानावर येत आहे. जिल्ह्यांचे विभाजन होणार असेल तर शिवनेरी असे जिल्ह्याचे नामकरण व्हावे. या भागातील तमाम शिवप्रेमींची मागणी आहे.
पाणीपुरवठा टप्पा ‘अमृत – 3 ‘साठी शासनाचे सहकार्य मिळावे
पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे शहराचे विस्तारीकरण चहूबाजूंनी होत असून अनेक भागांमध्ये नागरिक वास्तव्याला पसंती देत आहेत त्यामुळे आगामी काळात शहरासाठी नियोजित, सक्षम पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे यासाठी पिंपरी चिंचवडच्या पाणीपुरवठा टप्पा ‘अमृत – 3 ‘साठी शासनाचे सहकार्य मिळावे अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.