Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

ॲसिडिटीची समस्या सतावत असेल तर ‘या’ फळांचे चुकूनही करू नका सेवन

Health : बदलत्या जीवनशैलीमुळे अयोग्य आहारपद्धती, अस्वस्थ खाण्या-पिण्याच्या सवयी आणि फास्ट फूडचे जास्त सेवनामुळे अ‍ॅसिडिटीची सामान्य समस्या अधिक तीव्र होते. अनेकांना या समस्येचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. कारण की डाएटमध्ये असलेली काही अशी फळं आहेत जी आरोग्यदायी मानली जातात परंतु ही फळे ॲसिडिटीची समस्या उद्भवणाऱ्यांसाठी धोकादायक ठरू शकतात. तुम्हालाही ॲसिडिटीची समस्या सतावत असेल तर काही अशी फळं आहेत जी आरोग्यासाठी फायदेशीर नसतात. तर आजच्या लेखात आपण अ‍ॅसिडिटी झाल्यास कोणती फळांचे सेवन करणे टाळावे आणि का ते जाणून घेऊयात.

  1. संत्र

तुम्हाला जर सतत ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर संत्र्यांचे सेवन करणे टाळावेत. जरी ते व्हिटॅमिन सीचे समृद्ध स्रोत असले तरी त्यात सायट्रिक ॲसिड असते. संत्री खाल्ल्याने छातीत जळजळ आणि ॲसिड रिफ्लक्स वाढू शकते.

  1. लिंबू

तुम्हाला जर ॲसिडिटी होत असेल तर लिंबू खाणे टाळावे. त्यात तीव्र गॅस्ट्रिक ॲसिड असते जे ॲसिडिटी वाढवू शकते, विशेषतः रिकाम्या पोटी सेवन केल्यास.

हेही वाचा –  प्रा.बारीन शेख याना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यापीठाची पीएचडी प्रदान

  1. अननस

तुम्हाला जर अ‍ॅसिडिटी असेल तर अननस देखील खाणे टाळावे. हेल्थलाइनच्या मते, त्यात सायट्रिक ॲसिड आणि ब्रोमेलेन नावाचे एंजाइम असते, जे पोटातील ॲसिड वाढवू शकते आणि छातीत जळजळ होऊ शकते.

  1. कैरी

आयुर्वेदात कैरी खाण्यासही मनाई केले जात आहे. त्यात सायट्रिक, मॅलिक आणि ऑक्सॅलिक ॲसिड असतात, जे पित्त वाढवतात ज्यामुळे छातीत जळजळ आणि आम्लता होते.

  1. पेरू

पेरूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यात कडक बिया असतात, ज्या पचायला बराच वेळ लागतो. त्यामुळे कमकुवत पचनसंस्था असलेल्यांसाठी पेरूचे सेवन हानिकारक ठरू शकते. त्यांच्या अपचनक्षमतेमुळे ते आम्लता वाढवू शकतात.

  1. द्राक्ष

द्राक्षे हे अँटिऑक्सिडंट्सचा एक उत्तम स्रोत आहेत. त्यांचे सेवन केल्याने पित्त वाढते. त्यात सायट्रिक आणि टार्टेरिक आम्लांचे प्रमाण जास्त असते. हे आम्ल पोटातील आम्ल आणखी वाढवू शकतात, विशेषतः रिकाम्या पोटी सेवन केल्यास छातीत जळजळ होऊ शकते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button