प्रा.बारीन शेख याना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यापीठाची पीएचडी प्रदान

पिंपरी-चिंचवड : एम. आय. टी. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील प्रा. बारीन शेख यांनी संगणक शास्त्र विषयात पीएच.डी. पदवी यशस्वीरित्या संपादन केली आहे. त्यांनी “बिग डेटामध्ये फेअर शेड्युलरचे लोड बॅलेंसिंग परफॉर्मन्स सुधारण्यासाठी पार्टिकल स्वॉर्म ऑप्टिमायझेशन दृष्टिकोन” या विषयावर संशोधन पूर्ण केले. हे संशोधन बिग डेटा फेअर शेड्युलरच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी निसर्ग-प्रेरित अल्गोरिदम पार्टिकल स्वॉर्म ऑप्टिमायझेशन चा वापर करून करण्यात आले आहे. त्यांना ही पदवी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यापीठ, इंदूर (मध्यप्रदेश) यांच्याकडून प्रदान करण्यात आली. त्यांचा संशोधन विषय बिग डेटा प्रणालींमध्ये वापरल्या जाणाऱ्या फेअर शेड्युलर या तंत्राच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यावर आधारित आहे.
मोठ्या प्रमाणावर डेटा प्रक्रिया करताना विविध कामांमध्ये संसाधनांचे योग्य वाटप (लोड बॅलन्सिंग) होणे अत्यंत महत्त्वाचे असते. या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी पार्टिकल स्वॉर्म ऑप्टिमायझेशन या निसर्ग-प्रेरित अल्गोरिदमचा वापर केला. या संशोधनात PSO पद्धतीच्या साहाय्याने शेड्युलरची कार्यक्षमता, गती आणि संसाधनांचा वापर अधिक संतुलित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दृष्टिकोनामुळे बिग डेटा प्रोसेसिंग अधिक जलद, अचूक आणि परिणामकारक होऊ शकते, ज्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर डेटा हाताळणाऱ्या उद्योग, संशोधन संस्था आणि क्लाउड कम्प्युटिंग प्रणालींना होऊ शकतो.
हेही वाचा – झिंजूर्डे मळा परिसरात रस्ता काँक्रिटीकरणाला ‘‘गती’’

त्यांना डॉ. दीपिका पाठक यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यापीठाचे कुलगुरू व मार्गदर्शक व महाविदयालयातील संचालक डॉ बी बी वाफारे या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “हे संशोधन देशातील तंत्रज्ञान विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल.” त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविदयालयातील सर्व प्राध्यापकांनी विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकारी व मित्रपरिवार यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.




