Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

तीन दिवस व्हीआयपी दर्शन बंद, महाशिवरात्रीसाठी त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टचा महत्वाचा निर्णय…

नाशिक :  बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेल्या श्री त्र्यंबकेश्वराचे मंदिर येत्या रविवारी (दि. १५) महाशिवरात्री उत्सवानिमित्त दर्शनासाठी सलग ४१ तास खुले राहणार आहे. तसेच दिनांक १४ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सर्व प्रकारचं व्हीआयपीदर्शन पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने घेतला आहे.

महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वरला भाविकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेत प्रशासनानं दर्शनाबाबत महत्त्वाचे बदल केले आहेत. भाविकांना दर्शन सुलभ व्हावं यासाठी सलग ४१ तास मंदिर खुलं राहणार आहे. रविवारी (दि. १५) पहाटे ४ वाजल्यापासून सोमवारी (दि.१६ ) रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे. मुख्य दर्शन रांग पूर्व दरवाजा दर्शनबारी इथून महाशिवरात्रीच्या दिवशी २४ तास सुरू राहील. महाशिवरात्रीच्या दिवशी देणगी दर्शन पूर्णपणे बंद असणार आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भाविकांना गर्भगृहात जाऊन दर्शन घेण्यास मनाई करण्यात आली आहे.

हेही वाचा –  ‘मुंबई महानगर क्षेत्रात ‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करा’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्थानिक त्र्यंबकवासियांसाठी स्थानिकांसाठी वेगळी दर्शन रांग नियोजित करण्यात आली आहे. स्थानिक त्र्यंबकवासियांसाठी रविवारी पहाटे ४ ते सकाळी १० आणि सायंकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी (दि. १६) सकाळी १० वाजेपर्यंत दर्शनाची स्वतंत्र वेळ आणि दरवाजा निश्चित करण्यात आला आहे. स्थानिकांना पश्चिम दरवाजातून दर्शन दिलं जाणार आहे. मात्र त्यावेळी ओळखपत्र आणणे अनिवार्य आमहाशिवरात्रीनिमित्त मंदिरात विशेष महापूजा रविवारी रात्री ११ वाजता झाल्यानंतर मंदिर प्रांगणात त्र्यंबक राजाची पालखी मिरवणूक निघेल. तसंच रविवारी महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर मंदिरात महापूजा, आरती अभिषेक असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सोमवारी (दि.१६) दुपारी ३ वाजता मंदिरातून कुशावर्त तीर्थपर्यंत मेनरोडने शहरातून पालखी मिरवणूक निघेल. कुशावर्त तीर्थावर पूजा आणि आरती होऊन पालखी परत मंदिरात येईल.

महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात विशेष महापूजा रविवारी रात्री ११ वाजता झाल्यानंतर मंदिर प्रांगणात त्र्यंबक राजाची पालखी मिरवणूक निघेल. तसंच रविवारी महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर मंदिरात महापूजा, आरती अभिषेक असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सोमवारी (दि.१६) दुपारी ३ वाजता मंदिरातून कुशावर्त तीर्थपर्यंत मेनरोडने शहरातून पालखी मिरवणूक निघेल. कुशावर्त तीर्थावर पूजा आणि आरती होऊन पालखी परत मंदिरात येईल.

रविवारी (दि.१५) दुपारी ४ वाजता अघोर नृत्याचे सादरीकरण होणार आहे. यासह गायक व संगीतकार सुधीर फडके यांच्या गीत रामायणाचा कार्यक्रम सायंकाळी सात वाजता होणार आहे. तर सोमवारी सायंकाळी ६ वाजता शास्त्रीय कथक नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे,’ अशी माहिती त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कैलास घुले यांनी दिली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button