इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक ८ मधील उद्यान सुशोभीकरणाला ‘‘हिरवा कंदील’’
भाजपा मंडलाध्यक्ष शिवराज लांडगे यांची माहिती

महापालिका निवडणूक काळात दिलेले आश्वासन पूर्ण
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या वेळी स्थानिक नागरिकांना दिलेले आश्वासन आता पूर्णत्वाला पोहचले आहे. प्रभाग क्रमांक ८, इंद्रायणीनगर येथील रामकृष्ण मोरे उद्यान तसेच गुरुविहार कॉलनीतील गणेश मंदिर उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी महत्त्वपूर्ण कामे सुरू झाली आहेत.
भाजपाचे नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा मंडलाध्यक्ष शिवराज लांडगे यांनी याकामी पाठपुरावा केला. त्यानंतर महापौर रवी लांडगे यांनी उद्यान विभागाचे अध्यक्ष श्री. गारगोटे यांना त्वरित सूचना दिल्या. दि. १६ मार्च २०२६ रोजी स्थळ पाहणी करून कामांचे अहवाल दि. २३ मार्चला सादर करण्यात आले.
हेही वाचा : ‘रामायण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; प्रभु श्रीरामाच्या भूमिकेत रणबीर कपूर
भाजपा मंडलाध्यक्ष शिवराज लांडगे यांनी सांगितले की “महापालिका निवडणुकीच्या वेळी नागरिकांना दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण केले आहे. श्रेये साठी नव्हे, सेवेसाठी आम्ही काम करीत आहोत.
प्रलंबित कामांची यादी…
पिण्याच्या पाण्याच्या टाकी दुरुस्ती व पाणी सोडण्याची व्यवस्था. पाथवे व स्वच्छतागृह दुरुस्ती. सेप्टी टँक क्लिनिंग. खेळणीच्या पिसांमध्ये दांडे व Golden Sand टाकणे. पाईपलाइन दुरुस्ती. कम्पोस्ट पीठ तयार करणे. तसेच, बंद असलेले दिवे सुरु करणे. पाण्याच्या टाकीवर विद्युत पंप बसवणे. उद्यान सुशोभीकरण पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुशोभित उद्यानाची सुविधा उपलब्ध होईल.
महापालिका निवडणुकीच्या वेळी स्थानिक नागरिकांना दिलेले आश्वासन आता पूर्णत्वाला पोहचले आहे. आमचे प्रयत्न सदैव ‘श्रेये साठी नव्हे, सेवेसाठी’ या तत्त्वावर आधारित आहेत. प्रभाग क्रमांक ८ मधील रामकृष्ण मोरे उद्यान आणि गणेश मंदिर उद्यान सुशोभित करून नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ सुविधा देणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे.”
– शिवराज लांडगे, मंडलाध्यक्ष, भाजपा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा





