Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

‘रामायण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; प्रभु श्रीरामाच्या भूमिकेत रणबीर कपूर

Ramayana Teaser | हनुमान जयंतीचं औचित्य साधत बहुचर्चित रामायण या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या बिग बजेट ऐतिहासिक चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं असून प्रेक्षकांना हा सिनेमा दोन भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

बॉलीवूड सुपरस्टार रणबीर कपूर याचा या सिनेमातील लूक कसा असेल याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. यापूर्वी सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर लीक झाले होते, मात्र ते स्पष्ट नव्हते. आता टीझर प्रदर्शित झाल्यानंतर रणबीरचा श्रीरामाच्या भूमिकेतील पहिला अधिकृत लूक समोर आला आहे.

‘रामायण’ चित्रपटाच्या पहिल्या टीझरला ‘रामा’ असं नाव देण्यात आलं आहे. या टीझरमध्ये रणबीर शांत, संयमी आणि तेजस्वी रूपात दिसत असून त्याचा स्क्रीन प्रेझेन्स नेहमीप्रमाणे प्रभावी वाटतो. विशेष म्हणजे, राजा दशरथांकडून श्रीरामांना वनवासाची आज्ञा मिळाल्याचा महत्त्वाचा प्रसंगही टीझरमध्ये दाखवण्यात आला आहे.

हेही वाचा      :                लखनौच्या पराभवानंतर संजीव गोयंका ऋषभ पंतवर संतापले? मैदानातील व्हिडिओ व्हायरल 

टीझरच्या शेवटी प्रभु श्रीरामांसोबत सीता माता आणि लक्ष्मण यांची झलकही पाहायला मिळते. रणबीरने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या सिनेमासाठी घेतलेली मेहनत या पहिल्याच टीझरमध्ये स्पष्टपणे जाणवते, अशी प्रतिक्रिया चाहत्यांकडून दिली जात आहे.

या भव्यदिव्य चित्रपटाच्या निर्मितीत आठ वेळा ऑस्कर पुरस्कार विजेता डीएनईजी आणि मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स या व्हिज्युअल इफेक्ट्स स्टुडिओंचा सहभाग आहे.

दरम्यान, ‘रामायण’ हा हिंदी सिनेविश्वातील आतापर्यंतचा सर्वात मोठ्या बजेटचा चित्रपट ठरणार असल्याची चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्या दोन्ही भागांचं एकत्रित बजेट जवळपास ४ हजार कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसोबत साई पल्लवी, यश, सनी देओल, लारा दत्ता आणि रकुल प्रीत सिंह हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button