TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

कर्वे रस्त्यावर दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचार्‍यांचे मोबाइल चोरले

कर्वे रस्त्यावर तरुणीचा मोबाइल संच दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली.याबाबत एका तरुणीने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी प्रभात रस्ता भागात राहायला आहे.

कोथरुड परिसरातील कोकण एक्सप्रेस हाॅटेलजवळ ती रिक्षाची वाट पाहत थांबली होती. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी तिच्या हातातील २० हजार रुपयांचा मोबाइल संच हिसकावून नेला.या परिसरात रोहन नरके या तरुणाचा मोबाइल संच हिसकावून नेण्यात आल्याची आणखी एक घटना घडली. पोलीस उपनिरीक्षक सपताळे तपास करत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button