ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लोकांना विश्वासात घेऊनच विकास आराखड्याला अंतिम रूप: आमदार शंकर जगताप

नवीन प्रारूप शहर विकास आराखड्यावर नागरिकांच्या हरकती व सूचनांसाठी भव्य मेळावा

पिंपरी- चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रारूप विकास आराखड्यातील रस्ते व आरक्षणांच्या विरोधात नागरिकांच्या हरकती व सूचना जाणून घेण्यासाठी आमदार शंकर जगताप यांनी प्रेरणा शाळा मैदान, भोंडवे नगर येथे नुकताच भव्य मेळावा घेतला. नागरिकांनी आपल्या तक्रारी व आक्षेप स्पष्टपणे मांडले असता, आमदार शंकर जगताप यांनी “विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. सर्व नागरिकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातील,” अशी ग्वाही दिली.

महानगरपालिकेच्या नवीन विकास आराखड्यानुसार १२, १५ आणि २४ मीटर रुंदीचे रस्ते आरक्षित करण्यात आले आहेत. यामुळे अनेक नागरिकांच्या घरांवर थेट परिणाम होणार असून काहींना बेघरही व्हावे लागेल, अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर हरकती नोंदवण्यासाठी व आपले मुद्दे मांडण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या वेळी आमदार शंकर जगताप यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि स्पष्ट आश्वासन दिलं की, “मी प्रत्येक घर वाचवण्यासाठी तुमच्यासोबत आहे. कोणतीही योजना ही लोकांच्या हितासाठीच असावी लागते. जर कुठल्याही नागरिकावर अन्याय होत असेल, तर तो अन्याय थांबवण्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा राहील.”

या मेळाव्याचे संयोजन नीलेश भोंडवे, बिभीषण चौधरी, मनोज तोरडमल, नामदेव ढाके, सचिन चिंचवडे, शेखर चिंचवडे, नाना शिवले, धनंजय वाल्हेकर, सचिन शिवले, आदेश नवले, कविताताई दळवी, दीपक वाल्हेकर, प्रवीण वाल्हेकर, वाल्मिक शिवले, दत्ताभाऊ ढगे, तुषार वाल्हेकर, नीलेश वाल्हेकर, पाटीलबुवा चिंचवडे, खंडुदेव कथारे, चंद्रहास वाल्हेकर, अनिकेत क्षीरसागर यांच्यासह वाल्हेकरवाडीच्या नागरिकांनी संयुक्तपणे केले.

या मेळाव्याच्या माध्यमातून स्थानिकांनी आपल्या व्यथा, अडचणी व अपेक्षा थेट लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवल्या. आता या आक्षेपांच्या अनुषंगाने आमदार शंकर जगताप लोकाभिमुख निर्णय घेतील, असा विश्वास यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button