Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

‘तिफन २०२५’ स्पर्धेत पीसीसीओईच्या ‘टीम ॲब्युश’ला प्रथम पारितोषिक

शिक्षण विश्व : पीसीईटीच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा

पिंपरी-चिंचवड | सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स (एसएइ) इंडिया आणि जॉन डिअर इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या ‘तिफन २०२५’ या राष्ट्रीय कृषी यंत्रणा स्पर्धेत पीसीसीओईच्या ‘टीम ॲब्युश’ ने प्रथम क्रमांक पटकावून पीसीईटीच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

अहिल्यानगर मधील राहुरी कृषी विद्यापीठ येथे या स्पर्धेची अंतिम फेरी आणि बक्षीस वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी देशभरातील ७४ नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध संघ, त्यांचे मार्गदर्शक प्राध्यापक आणि प्रमुख पाहुणे उपस्थित होते. पीसीसीओईच्या ‘टीम ॲब्युश’ने विकसित केलेल्या ‘कृषिरथ ७.०’ ने या स्पर्धेतील सर्व टप्प्यातील सर्व निकष पूर्ण करीत राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या टीमला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चे डीन डॉ. आर. डी. बनसोड, स्पर्धेचे संयोजक संदीप राजपूत, संचालक अभिजीत फडके, कॉर्पोरेट अफेअर्सचे संचालक मुकुल वर्शने यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र आणि एकूण एक लाख चाळीस हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा कृषी अभियांत्रिकी नवोपक्रमांवर आधारित असते. यावर्षी स्पर्धेचा विषय “स्वयंचलित मल्टी-वेजिटेबल ट्रान्सप्लांटर तयार करणे” हा होता.

हेही वाचा   :  “केशव माधव न्यास” तर्फे ‘ऑपरेशन सिंदूर’- पराक्रम अभूतपूर्व ‘या विषयावर व्याख्यान 

सुमित चौगुले, उमेश बाराते, अनुराग नेवाळे, रोहित शिंदे, सुदर्शन काशिद, कौस्तुभ कोल्हापुरे, अहिल्या मेटकरी, प्रेरणा कोळेकर, प्रांजल गुजर, सर्वेश गाडेकर, पार्थ अवलकर आणि आदित्य गवळी यांनी विकसित केलेल्या ‘कृषिरथ ७.०’ ने संकल्पना विकास, प्रात्यक्षिक, चाचणी आणि सादरीकरण यामधील प्रत्येक टप्प्यावर उल्लेखनीय कामगिरी केली. मार्गदर्शन प्रा. ईशान साठोने यांनी केले. तांत्रिक मार्गदर्शन जॉन डीअर कंपनीच्या गौरी साळुंखे आणि अक्षता नागवडे यांनी केले. शेतातील प्रात्यक्षिकांसाठी अजय चौगुले यांनी साहाय्य केले. पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. नीळकंठ चोपडे, अधिष्ठाता डॉ. पद्माकर देशमुख, सह अधिष्ठाता डॉ. राहुल पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ. शीतलकुमार रवंदळे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभाग प्रमुख डॉ. नरेंद्र देवरे, मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. प्रवीण काळे, इनोव्हेशन व इनक्युबेशन सेंटरचे अशोक गाडेकर यांनी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिल्यामुळे हे यश मिळाले.

पीसीसीओईच्या ‘टीम ॲब्युश’ने विकसित केलेल्या ‘कृषिरथ ७.०’ ने या स्पर्धेतील क्वालिफायिंग राउंड, व्हर्च्युअल राउंड, माईलस्टोन सबमिशन, स्टॅटिक राउंड, कॉस्ट व इव्हॅल्युएशन राउंड, सेल्स व मार्केटिंग राउंड आणि डायनॅमिक राउंड या सर्व राउंड मध्ये प्राविण्य दाखवून या राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे व पीसीसीओईचे नाव उज्वल केले. यशस्वी टीमचे व मार्गदर्शकांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष श्रीमती पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन केले.

रोपलागवडीचे स्वयंचलित नियोजन

‘कृषिरथ ७.०’ ही यंत्रणा वांगी, मिरची, टोमॅटो यांसारख्या विविध फळभाज्या व भाजीपाला पिकांसाठी सुसंगत आहे. यामध्ये रोपांची कार्यक्षमता ९० टक्क्यांपेक्षा जास्त रहाते. रोपांचे नुकसान अत्यंत कमी होते. रोपांची अचूकता, स्थिरता आणि उत्पादकता उच्च व्हावी यासाठी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक आणि हायड्रॉलिक नियंत्रण प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यंत्रामध्ये, रोपसंख्या मोजणी व रोपलागवडीचे स्वयंचलित नियोजन तसेच विविध सेन्सर व अभ्रक वापरून सुरक्षा व कार्यदक्षता सुनिश्चित करणारी प्रणाली समाविष्ट केली आहे. ‘कृषिरथ ७.०’ या यंत्रणेत शेतकऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च महत्त्व देण्यात आले आहे आणि हे आधुनिक कृषी अभियांत्रिकीतील उत्कृष्ट नमुना मानले जाते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button