Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ठरलं.. : चिंचवड विधानसभेत शंकर जगताप भाजपाचे उमेदवार!

आमदार अश्विनी जगताप यांचा ‘ग्रीन सिग्नल’ : प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी

पिंपरी : “चिंचवडमधून शंकर जगताप यांना उमेदवारी द्या..” अशी मागणी आमदार अश्विनी जगताप यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या जगताप कुटुंबातील गृहकलह मिटला असून शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग एक प्रकारे मोकळा झाला आहे.

चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी जगताप यांनी शंकर जगताप यांच्यासमवेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची काल पुण्यात भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यासोबत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची कन्या ऐश्वर्या रेणुसे या देखील उपस्थित होत्या. “माझ्या ऐवजी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना चिंचवड मधून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी ⁠⁠आमदार अश्विनी जगताप यांनी केली असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा    –      ‘शरद पवारांनी राज्याला विकासापासून दूर ठेवले’; उदयनराजेंची टीका 

शंकर जगताप हे अश्विनी जगताप यांचे दीर आहेत. दोघांमध्ये चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारी वरुन अंतर्गत वाद सुरु असल्याचे बोलले जात होते. अखेर आमदार अश्विनी जगताप यांनी माघार घेत दीर शंकर जगताप यांचा विधानसभा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा केला आहे. या घडामोडींमुळे जगताप कुटुंबातील वाद मिटला असून उमेदवारीवरून भाजपची सुरू असलेले डोकेदुखी दूर झाली असल्याचे बोलले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button