‘प्रियदर्शनी स्कूल’मध्ये ‘मिशन रेबीज’ अंतर्गत जनजागृती
शिक्षण विश्व: चिमुरड्यांना मिळाले सुरक्षिततेचे धडे

पिंपरी-चिंचवड | प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे इयत्ता १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांसाठी Mission Rabies या संस्थेमार्फत रेबीज जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले.
या सत्राचा उद्देश विद्यार्थ्यांना रेबीज आजाराविषयी माहिती देणे, त्याची कारणे, लक्षणे तसेच प्रतिबंधात्मक उपाय समजावून सांगणे हा होता. आकर्षक सादरीकरणे, व्हिडिओ आणि संवादात्मक उपक्रमांद्वारे तज्ञांनी रेबीजचा प्रसार कसा होतो आणि वेळेवर लसीकरणाचे महत्त्व काय आहे हे सोप्या भाषेत स्पष्ट केले.
हेही वाचा : चिखलीतील EWS घरकुलधारकांना घरपट्टीतून सूट द्या!
विद्यार्थ्यांना प्राण्यांजवळ सुरक्षितपणे कसे वागावे तसेच कुत्र्याने चावा घेतल्यास कोणती काळजी घ्यावी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. “दुर्लक्ष करू नका, त्वरित उपचार घ्या” हा महत्त्वाचा संदेश या सत्रातून देण्यात आला.
विद्यार्थ्यांनी या सत्रात उत्साहाने सहभाग घेतला. शाळेच्या व्यवस्थापनाने Mission Rabies संस्थेचे आभार मानून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होत असल्याचे सांगितले.





