धक्कादायक! पुण्यात स्कुल बसमध्ये दोन चिमुकलींवर चालकांकडून अत्याचार

पुणे | बदलापूरची घटना ताजी असतानाच पुण्यात चालत्या स्कूलबसमध्ये २ चिमुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील वानवडी परिसरातील हा धक्कादायक प्रकार आहे. ४५ वर्षीय व्यक्तीवर या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांसोबत हा प्रकार घडला आहे. आरोपी हा या शाळेतील विद्यार्थ्यांना बसमधून शाळेत सोडण्याचे व आणण्याचे काम करतो. बसमध्ये दोन्ही चिमुरडी या पुढच्या सीटवर बसतात. बस चालकाने ६ वर्षांच्या चिमुरडीसह तिच्या मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केला. गेल्या ४ दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. अत्याचार प्रकरणी ४५ वर्षीय नराध्यम स्कूल बस चालकावर वानवडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस, दोन महिन्यांचे पैसे एकत्रच मिळणार; अजित पवारांची घोषणा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा चालत्या बसमध्ये चिमुरडींसोबत अश्लील चाळे करत होता. दोन्ही चिमुरडीना जवळ बसून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. बदलापूरच्या घटनेनंतर पुण्यातील धक्कादायक प्रकाराने शहरात मोठी खळबळ माजली आहे. अल्पवयीन चिमुरडी घरी परतल्यानंतर तिला प्रायव्हेट पार्टच्या ठिकाणी वेदना होत होत्या. त्यानंतर मुलीच्या आईने तिची विचारपूस केली. तेव्हा तिने तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार आईला सांगितला. चिमुकलीने या सगळा प्रकार घरी सांगितल्यानंतर उघडकीस आला आहे.