ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमनोरंजन

‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पिंपरी-चिंचवडमध्ये दणक्यात ‘प्रमोशन’

भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती : रहाटणी येथे शानदार सोहळा

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमधील थोपटे लॉन्स येथे आगामी मराठी चित्रपट ‘राजा शिवाजी’ च्या प्रचारासाठी भव्य आणि दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते रितेश देशमुख यांची विशेष उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमात शिवगर्जनेच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

“आपला आवाज”, “आपली सखी महिला मंच” आणि Jio Studios यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे नियोजन “आपला आवाज आपली सखी”च्या संचालिका संगिता तराडे यांनी केले.

या सोहळ्याला पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे (बापू काटे) तसेच स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी उपस्थित राहून रितेश देशमुख यांचे स्वागत केले.

हेही वाचा      :                  चिखलीतील EWS घरकुलधारकांना घरपट्टीतून सूट द्या!

यावेळी बोलताना शत्रुघ्न (बापू) काटे यांनी “राजा शिवाजी” चित्रपटाचे कौतुक करत म्हटले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ आमचे आराध्य दैवत नाहीत, तर ते आमचा श्वास आहेत. त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे. रितेशजींचा हा प्रयत्न महाराष्ट्राचा स्वाभिमान जागतिक स्तरावर पोहोचवणारा आहे.”

चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली

या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी रितेश देशमुख यांच्याशी संवाद साधून चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल माहिती घेतली. शिवकालीन इतिहास पडद्यावर साकारण्यासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे सर्वांनी कौतुक केले. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत नवा विक्रम प्रस्थापित करेल आणि शिवरायांची कीर्ती पुन्हा घराघरात पोहोचवेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. थोपटे लॉन्स येथे आयोजित या कार्यक्रमाला शिवप्रेमी आणि चाहत्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. कार्यक्रमाच्या माध्यमातून “राजा शिवाजी” चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, देशभर शिवविचारांचा जागर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button