Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुनावळेतील रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत नागरिकांची तक्रार, आयुक्तांकडे चौकशीची मागणी

गायकवाड नगर परिसरातील डांबरीकरणात अनियमितता; स्थानिकांनी उचलला आवाज

पिंपरी-चिंचवड | पुनावळे परिसरातील गायकवाड नगर (प्रदीप स्वीट्स ते जी.के. आरकॉन रस्ता) येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामात गंभीर अनियमितता असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

भाजपाचे राहुल काटे म्हणाले की, रस्त्याचा काही भाग नीट खोदून मजबूत पाया घालण्यात आला असला तरी, उर्वरित भागात फक्त वरून डांबरीकरण करून शॉर्टकट घेतल्यासारखी कार्यपद्धती अवलंबण्यात आली आहे. या कामाबाबत पीसीएमसीच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक कारणे सांगून समाधान देण्याचा प्रयत्न केला असला, तरी प्रत्यक्षात काही दिवसांतच रस्त्यावर खड्डे आणि उखडलेले भाग स्पष्टपणे दिसून येत आहेत.

स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात रस्त्याच्या संपूर्ण चौकशीची मागणी केली असून, संपूर्ण रस्ता एकसंध आणि मजबूत पाया घालून पुन्हा बांधण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा    :    वाहनधारकांची महत्त्वाची बातमी, ‘HSRP’ नंबर प्लेट बसवण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ 

प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:

रस्त्याच्या बांधकामाची तातडीने चौकशी करावी. संपूर्ण रस्ता योग्य तांत्रिक पायाभरणी करून पुन्हा बांधण्याचे आदेश द्यावा. पदपथ व डिव्हायडरमध्ये देशी वृक्षांची लागवड करावी. गंजलेले स्ट्रीटलाइट पोल हटवून नवे व दर्जेदार पोल बसवावेत. ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण व आवश्यक कारवाई करावी. नागरिकांनी यासोबतच सुचवले आहे की, पुनावळे परिसरात पदपथ, डिव्हायडर आणि सार्वजनिक सुविधा उभारताना निगडी प्राधिकरणातील दर्जा व नियोजनाचे अनुकरण करावे. तसेच, ईला सोसायटीसमोर नव्याने बसवलेले गंजलेले स्ट्रीटलाइट पोल हे सौंदर्य, सुरक्षितता आणि शाश्वततेच्या दृष्टिकोनातून धोकादायक असल्याचेही निदर्शनास आणले आहे.

पुनावळेतील रस्त्यांच्या कामाबाबत आमदार शंकर जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहेत. सोसायटीधारक आणि स्थानिक नागरिकांनी चांगल्या पायाभूत सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजेत. रस्त्याचे काम निकृष्ठ असल्यामुळै सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

– राहुल काटे, भाजपा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button