पीसीयू ग्रंथालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ग्रंथ प्रदर्शन
शिक्षण विश्व : विद्यार्थ्यां आणि प्राध्यापकांचा मोठ्या संख्येने सहभाग

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड विद्यापीठाच्या (पीसीयू) ग्रंथालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बरोबरच महान मराठा योद्धांना अभिवादन करण्यात आले. या प्रदर्शनात शिवाजी महाराजांचे दूरदर्शी नेतृत्व, सैन्यनीती आणि प्रेरणादायी वारसा यांचा उलगडा करणाऱ्या ऐतिहासिक पुस्तकांचा समावेश करण्यात आला होता.
विद्यार्थ्यां आणि प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन ग्रंथ संपदेचा लाभ घेतला. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन पीसीयूच्या उपकुलगुरु डॉ. मणिमाला पुरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभारी उपकुलगुरू डॉ. सुदीप थेपडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
हेही वाचा – अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त वाहतूक बदल; बाणेर, बालेवाडी भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने
हे ग्रंथ प्रदर्शन पीसीईटी आणि पीसीयूच्या प्रमुख मार्गदर्शक आणि विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत पार पडले. या वेळी पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, व्यवस्थापन प्रतिनिधी नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर तसेच कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आदी उपस्थित होते.
डॉ. मणिमाला पुरी यांचे मार्गदर्शन…
डॉ. मणिमाला पुरी यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जतन करणे आणि शैक्षणिक चर्चेच्या माध्यमातून तो पुढे नेण्याची जबाबदारी युवा पिढीवर आहे. डॉ. सुदीप थेपडे यांनी शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याची माहिती व त्यांच्यामध्ये असणारे नेतृत्व गुण, शिवाजी महाराजांचे जीवन, त्यांचे प्रशासन आणि सैन्यनीती याची माहिती दिली.