महाशिवरात्रीचा उपवास करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे.
उपवासाच्या दिवशी जास्त तळलेले किंवा जड अन्न खाणे टाळा कारण त्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

पुणे : महाशिवरात्री हा वर्षातील सर्वात मोठा सण आहे. भगवान शंकराची आराधना उपासना करण्यासाठी या दिवशी अनेक शिवभक्त उपवास करतात. यंदा महाशिवरात्री हा सण 26 फेब्रुवारी म्हणजे बुधवारी मोठ्या उत्साहात जगभरात साजरा केला जाणार आहे. विशेषतः महादेवाच्या भक्तांसाठी हा दिवस खूप खास आहे.
यावेळी पोषणतज्ञ नमामी अग्रवाल सांगतात की उपवासाचे धार्मिक महत्व आहे पण त्यामुळे शरीरालाही त्याचे अनेक फायदे होत असतात. पचनक्रिया चांगली राखण्यापासून ते विषारी पदार्थ काढून टाकण्यापर्यंत उपवासाचे विशेष फायदे सांगितले आहेत. पण उपवास करताना मात्र अनेकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही पहिल्यांदाच महाशिवरात्रीचा उपवास करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे.
हेही वाचा : महाशिवरात्रीनिमित्त आयोजित त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध
भरपूर पाणी प्या
अनेकदा काही लोकं महाशिवरात्रीचा उपवास करताना पाणीही पीत नाहीत. त्यामुळे तुम्ही असे अजिबात करू नका. उपवास करताना नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवणे महत्वाचे आहे. दिवसभरात कमीत कमी 8 ग्लास पाणी प्या. यामुळे शरीराला ऊर्जा मिळेल आणि डिहायड्रेशन देखील टाळता येईल.
वारंवार चहा पिऊ नका
आपण पाहतोय अनेकजण उपवासाच्या वेळी वारंवार चहा पिण्याची खूप सवय असते. पण तुम्ह अशी चूक करू नका. कारण उपवासाच्या दिवशी पोटाचा अन्न नसते, त्यामुळे वारंवार चहा पिल्याने गॅस आणि अॅसिड रिफ्लक्स सारख्या समस्या उद्भवू शकतात. तेव्हा तुम्ही सुद्धा उपवासाच्या दिवशी दिवसातून फक्त एकदाच चहा प्यावा.
आहाराची काळजी घ्या
तुम्ही जेव्हा पहिल्यांदा महाशिवरात्रीचा उपवास करता तेव्हा त्यादिवशी फळांचा आहार घ्यावा. यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीर डिहायड्रेट होत नाही. तसेच उपवासाच्या दिवशी जास्त तळलेले किंवा जड अन्न खाणे टाळा कारण त्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. तुम्ही फळे, साबुदाणा, मखाना किंवा हलका उपवासाचा नाश्ता खाऊ शकता.
त्याचवेळी जर तुम्हाला आधीच मधुमेह, हृदयरोग, यकृत-मूत्रपिंडाच्या समस्या अशा कोणत्याही आजाराने ग्रासले असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय उपवास करू नका. उपवासाच्या काळात औषधांमधील अंतरामुळे आजार वाढू शकतो.