आरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

प्लास्टिकच्या डब्यात पॅक केलेले अन्न तुमच्या आरोग्यााठी घातक

प्लास्टिक आपल्या शरीरामध्ये हळूहळू विषारी पदार्थ बनवतात

मुंबई : आजकाल प्रत्येक घरात प्लास्टिकची भांडी वापरली जात आहेत. चहा पिण्यापासून ते जेवणापर्यंत सर्व गोष्टींसाठी प्लास्टिकची भांडी वापरली जात आहेत. बाजारात उपलब्ध असलेले अनेक अन्नपदार्थही प्लास्टिकमध्ये पॅक केलेले असतात. लोकं पलास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. आज प्लास्टिक आपल्या जीवनामध्ये प्लास्टिकचा वापर इतका वाढला आहे की लोक बाजारातून प्लास्टिकच्या डब्यांमध्ये अन्न खरेदी करणे देखील पसंत करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की प्लास्टिकमध्ये अन्न खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला खूप नुकसान होऊ शकते. प्लास्टिक आपल्या शरीरामध्ये हळूहळू विषारी पदार्थ बनवतात.

प्लास्टिकच्या भांड्यात अन्न खाल्ल्याने कोणत्या समस्या उद्भवू शकतात आणि या समस्या टाळण्यासाठी काय केले पाहिजेल जाणून घेऊया. प्लास्टिकमध्ये बिस्फेनॉल ए आणि फॅथलेट्स सारखी अनेक हानिकारक रसायने असतात. जेव्हा तुम्ही गरम अन्न प्लास्टिकच्या डब्यात साठवता तेव्हा ही रसायने अन्नात मिसळू शकतात. यामुळे शरीरात हार्मोनल असंतुलन निर्माण होऊ शकते आणि हृदयरोग, कर्करोग, लठ्ठपणा, मधुमेह इत्यादी अनेक आजारांना आमंत्रण मिळते.

हेही वाचा  :  ‘आपण जाती विसरू तेव्हा मोठे होऊ’; अभिनेते नाना पाटेकर 

तज्ञांच्या मते, प्लास्टिकच्या डब्यात अन्न खाणे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. आज बाजारात प्लास्टिकच्या भांड्यांचा वापर इतका वाढला आहे की लोक पॅकबंद बॉक्समधून सहजपणे अन्न खाऊ लागले आहेत. प्लास्टिकच्या डब्यात पॅक केलेले अन्न खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो आणि हृदयविकार होऊ शकतात. जेव्हा हृदय शरीराच्या गरजेनुसार पुरेसे रक्त पंप करू शकत नाही तेव्हा ही स्थिती उद्भवते. याचा अर्थ हृदयविकारात हृदयाचा पंप खराब होतो.

यामुळे कालांतराने तुमच्या शरीराच्या इतर भागात रक्त जमा होऊ शकते. बहुतेक रक्त तुमच्या फुफ्फुसांमध्ये, पायांमध्ये आणि बोटांमध्ये जमा होऊ लागते, ज्यामुळे नंतर हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. पॅकेज्ड फूड कर्करोगासारख्या घातक आजारांनाही आमंत्रण देते. तज्ञांच्या मते, प्लास्टिकमध्ये असलेले काही रसायने शरीरात बराच काळ साचत राहतात आणि हळूहळू कर्करोगासारखे धोकादायक आजार होऊ शकतात. विशेषतः जेव्हा गरम अन्न प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये आणले जाते तेव्हा कर्करोगाचा धोका आणखी वाढतो. प्लास्टिकमध्ये विषारी घटक असतात ज्यामुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात. याचा तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ सकतो. शरीरतील हार्मोन्स असंतुलित झाल्यामुळे पुरूषांमधील शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते, ज्यामुळे भविष्यात मूल होण्यात समस्या येऊ शकतात. तसेच महिलांमध्ये मासिक पाळीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

जर तुम्ही दररोज प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये अन्न खाल्ले तर हळूहळू त्याचे छोटे कण शरीरात जमा होऊ लागतात. यामुळे गॅस, अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठता आणि पोटदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात. प्लास्टिक केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही तर पृथ्वीसाठीही धोकादायक आहे. प्लास्टिक शेकडो वर्षे नष्ट होत नाही आणि माती आणि पाणी दूषित करते. यामुळे केवळ पर्यावरणाचे नुकसान होत नाही तर प्राणी आणि सागरी प्राण्यांवरही वाईट परिणाम होतो. तुम्ही जेवताना स्टिलच्या भांड्यांचा वापर करू शकता. अनेकजण काचेचे भांडी वापरण्यास पसंती दोतात.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button