Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त वाहतूक बदल; बाणेर, बालेवाडी भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शनिवारी (२२ फेब्रुवारी) बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. शहा यांच्या दौऱ्यानिमित्त बाणेर भागातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. लष्कर भागातील रेसकोर्सजवळील पाण्याची टाकी परिसरात वाहतूक बदल करण्यात आले असून, पाण्याची टाकी ते टर्फ क्लब रस्ता वाहतुकीस तात्पुरत्या स्वरुपात दुतर्फा करण्यात येणार आहे.

वाहनचालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केे आहे. शनिवारी रेसकोर्सजवळील पाण्याची टाकी ते टर्फ क्लबर रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात दुतर्फा करण्यात येणार आहे.

हेही वाचा –  पिंपरी चिंचवड महापालिकेचा ९ हजार ६७५ कोटी २७ लाख रूपयांचा अर्थसंकल्प सादर

बाणेर रस्ता भागातील वाहतूक बदल पुढीलप्रमाणे – गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषीजी चौकातून (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) बाणेर रस्त्याने राधा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी गणराज चौकातून डावीकडे वळावे. तेथून भुयारी मार्गाने इच्छितस्थळी जावे. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरून बाणेरकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी बालेवाडी जकात नाका चौकातून डावीकडे वळून हाय स्ट्रीटमार्गे इच्छितस्थळी जावे. पुणे शहरातून हिंजवडी, वाकड, लोणावळा, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी विद्यापीठ चौकातून बाणेरकडे जाऊ नये. पाषाण रस्त्याने चांदणी चौक किंवा विद्यापीठ चौकातून ओैंधमार्गे इच्छितस्थळी जावे.

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त शनिवारी विद्यापीठ चौक ते चांदणी चौक दरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. विद्यापीठ चौक ते बाणेर परिसरातील राधा चौक, बाणेर रस्ता, तसेच विद्यापीठ चौक ते ओैंध येथील राजीव गांधी पूल दरम्यान सर्व प्रकारच्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून शहर परिसरात सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button