ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

शिवसेना-शिव उद्योग सहकार सेनेच्या शहराध्यक्षपदी संभाजी भेगडे यांची निवड!

पक्ष संघटना बळकट करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने घोषणा

पिंपरी- चिंचवड : शिवसेना मुख्यनेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, पिंपरी-चिंचवड शहरात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाची राजकीय नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील ‘बाळासाहेब भवन’ येथे पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात संभाजी हिरामण भेगडे यांची शिवसेना-शिव उद्योग सहकार सेनेच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी अधिकृत घोषणा करण्यात आली.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने ही निवड झाली असून, या प्रसंगी शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या हस्ते संभाजी भेगडे यांना अधिकृत नियुक्तीपत्र देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे आणि मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना-शिव उद्योग सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर वाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा नियुक्तीपत्र प्रदान सोहळा पार पडला.

या सोहळ्याला पुणे शहराध्यक्ष सदानंद कडलक, चित्रपट सेनेचे राज्य समन्वयक शुभम लोखंडे, लातूरचे संघटक पलांडे साहेब, कार्यालयीन सचिव पांडुरंग पाटील आणि राज्य समन्वयक विपुल चेपट यांच्यासह पिंपरी-चिंचवड व परिसरातील शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या महत्त्वपूर्ण नियुक्तीमुळे पिंपरी-चिंचवड या औद्योगिक नगरीत शिवसेना-शिव उद्योग सहकार सेनेला नवीन ऊर्जा मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून, स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास मी सार्थ करून दाखवेन. पिंपरी-चिंचवड शहरात पक्ष संघटना मजबूत करणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट असेल. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवून, तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून मुख्यनेते एकनाथजी शिंदे साहेब यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी मी अहोरात्र काम करेन. पक्षाने दिलेली ही मोठी जबाबदारी मी अत्यंत सक्षमतेने पार पाडीन.
– संभाजी भेगडे, शहराध्यक्ष, शिवसेना-शिव उद्योग सहकार सेना.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button