‘जेष्ठ नागरिकांना एक सुरक्षा कवच देणारी ‘आयुष्मान भारत’ योजना’; शत्रुघ्न काटे
पिंपळे सौदागर : भारतीय आरोग्य सेवेचा चेहरा मोहरा आता बदलत आहे. ज्येष्ठ नागरिकांना एक सुरक्षा कवच देणारी आयुष्यमान भारत योजना आहे असे मत भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष तथा माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केले. पिंपळे सौदागर येथील बासुरी बँक्वेट हॉल याठिकाणी आज शनिवारी (दि.११) रोजी नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशनतर्फे परिसरातील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आयुष्यमान भारत योजना नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी बोलताना शत्रुघ्न काटे म्हणाले की, आयुष्मान भारत योजना किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना ही एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे. जी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू केली गेली. या योजनेमधून लाभार्थ्यांना उपचारासाठी दरवर्षी आरोग्य विमा या आरोग्य योजने मार्फत देण्यात येत असते. तसेच प्रति कुटुंब ५ लाख रुपयांचे मोफत आरोग्य विमा संरक्षण दिले जाते.
हेही वाचा – दौंड परिसरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार
आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजनेत (AB PM-JAY) आता ७० वर्षे वयोगटातील वृद्धांचा समावेश करण्यात आला आहे. या योजने अंतर्गत रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी १० दिवस आधी आणि आणि नंतरच्या खर्चाचा परतावा या योजने अंतर्गत मिळतो. वृद्धांच्या आरोग्यासंबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांना अत्यंत आवश्यक आरोग्य विमा कवच प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. आयुष्य जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या प्रत्येकासाठी ही सोन्याची संधी असून या योजनेचा सर्व जेष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी केले आहे.
यावेळी परिसरातील सर्व जेष्ठ नागरिक संघातील तसेच सोसायटी मधील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.