Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची भागवत कथा महायज्ञाला भेट

मुंबई : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी पुरुषोत्तम मासानिमित्त जोगेश्वरी मुंबई येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा महायज्ञाला भेट देऊन उपस्थित भाविक श्रोत्यांशी संवाद साधला.
श्रीमद् भागवत ही चारित्र्य संपन्न समाज घडविणारी कथा असून त्यातून आदर्श जीवन जगण्याचे मार्गदर्शन होते, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा – राज्यभरात एफडीएची औषधांवरील आक्षेपार्ह जाहिराती व मिसब्रँडेड औषधसाठ्यांविरुद्ध धडक मोहीम
यावेळी राज्यपालांनी कथाकर्ता महावीर शरण शास्त्री यांचा सत्कार केला तसेच श्रीमद्भागवत महायज्ञ आयोजक सावरकर फाउंडेशनचे अभिनंदन केले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष व नगरसेवक रुपेश सावरकर उपस्थित होते.





