TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलातील जम्बो रुग्णालयात मेडिकल टेस्टिंग, कमिशनिंगचे काम करणाऱ्या संस्थेवर चार महिन्यांत 28 लाखांचा खर्च

पिंपरी चिंचवड | कोरोनाबाधित रुग्णांसाठी उभारलेल्या अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलातील जम्बो रुग्णालयात मेडिकल साहित्य पुरवठा, टेस्टिंग आणि कमिशनिंगसाठी कामकाज दिलेल्या संस्थेवर 29 मे ते 28 सप्टेंबर 2021 या चार महिने कालावधीत 28 लाख 32 हजार रुपये खर्च झाला आहे.

जुलै 2020 मध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढल्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलात जम्बो रुग्णालय उभारण्यात आले. त्यावेळी पीएमआरडीएने चित्रा सेल्स ॲण्ड सर्व्हिसेस यांना अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलातील मेडिकल साहित्य पुरवठा, टेस्टिंग आणि कमिशनिंगसाठी आदेश दिले होते. फेब्रुवारीमध्ये दुसऱ्या लाटेत कोरोना संसर्गामुळे रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने महापालिका आयुक्त, महापौर, अतिरिक्त आयुक्त तसेच इतर अधिकारी, पदाधिकारी यांची बैठक पार पडली. यात आयुक्तांनी जम्बो रुग्णालय सुरू करण्याचे आदेश दिले.

कोरोनासाठी स्थापन केलेल्या कार्यकारिणी समितीच्या 23 मार्च 2021 रोजी झालेल्या बैठकीत जम्बो रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. चित्रा सेल्स ॲण्ड सर्व्हिसेस यांचे कामकाज मुदतीनंतर नोडल अधिकारी आणि समन्वय अधिकारी यांच्या सांगण्यावरून चालू ठेवण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या कार्यालयात 17 डिसेंबर 2021 ला बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये चित्रा सेल्स यांचे कामकाज चालू असल्याने त्यांना 30 सप्टेंबर 2021 पर्यंत काम सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात यावेत, असा निर्णय घेण्यात आला. या कामकाजापोटी 29 मे ते 28 सप्टेंबर 2021 या कालावधीत चित्रा सेल्स यांना 28 लाख 32 हजार रुपये खर्च झाला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button