Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

टोमॅटोचे आरोग्यदायी फायदे

Tomatoes Health Benefits : टोमॅटो जगातील सर्वोत्तम फळ आहे. अमेरिकन आरोग्य संस्था सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या पोषण तज्ज्ञांनी हे सांगितले आहे. यासाठी त्यांनी जगातील 41 अशी फळे आणि भाज्या निवडल्या होत्या. ज्या पोषक तत्त्वांनी परिपूर्ण आहेत. या अभ्यासात असे दिसून आले की, टोमॅटोची पोषक घनता 20.37 आहे. या यादीतील सर्व फळे आणि भाज्यांमध्ये ती सर्वाधिक होती. टोमॅटोमध्ये लाइकोपीनसारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असते, जे हृदयाला निरोगी ठेवते आणि शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करते. तर जाणून घेऊया टोमॅटोच्या आरोग्यासाठी होणार्‍या फायद्यांविषयी…

टोमॅटोचे आरोग्य फायदे काय आहेत?

-टोमॅटो खाल्ल्याने अनेक प्रकारचे आरोग्य फायदे होतात.

-टोमॅटोमध्ये असलेले फायबर पचन सुधारण्यास मदत करते.

-व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात.

-पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

-टोमॅटोचे नियमित सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

-त्यातील जास्त पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते.

-टोमॅटो वजन नियंत्रित ठेवण्यासाठी व त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर.

हेही वाचा –  राजकुमार हिराणींचे ओटीटी पदार्पण ते सनी देओलचा ‘इक्का’; जुलैमध्ये OTT वर मनोरंजनाचा महापूर, वाचा संपूर्ण यादी!

अँटीऑक्सिडंटस् फायदेशीर आहेत का?

-टोमॅटोमध्ये लाइकोपीन, बीटा-कॅरोटीन व व्हिटॅमिन सी सारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंटस् असतात.

-ते शरीरातील पेशींना नुकसान पोहोचवणार्‍या फ्री रॅडिकल्सना निष्प्रभ करतात.

-यामुळे सूज कमी होते, हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो.

-लाइकोपीन काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासदेखील मदत करू शकते.

-हे अँटीऑक्सिडंटस् त्वचेला अकाली वृद्ध होण्यापासून वाचवतात आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button