Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निरोप समारंभ-इयत्ता १०वी २५ -वी बॅच (२०२५-२६)

आठवणी, कृतज्ञता आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा भावपूर्ण सोहळा

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

“अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनि जाती”……
“निरोपाचा क्षण नाही
शुभेच्छांचा सण आहे
पाऊल बाहेर टाकताना
रेंगाळत राहणार मन आहे”

अतिशय उत्साही पण तितकाच भावनावश असा हा शेवटचा दिवस संपन्न झाला.शनिवार, दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी संत साई शाळेच्या प्रांगणात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात “इतनी शक्ती हमे देना दाता” या प्रार्थनेने झाली. या प्रार्थनेमुळे संपूर्ण वातावरण शांत व प्रसन्न झाले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीचे विद्यार्थी निरज पालवे आणि मुग्धा लोंढे यांनी आत्मविश्वासाने व उत्कृष्टपणे केले.

हा कार्यक्रम श्वेता नारायणगावकर मॅडम व शाळेच्या ट्रस्टी पायल ढवळेश्वर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री. मनोज वाबळे सर, श्री. अक्षय राणे सर, श्रो. संजय अनार्थे सर, रिया पोतदार मॅडम आणि मालन लिगाडे मॅडम यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला. प्रमुख पाहुणे श्री. दिगंबर ढोकळे सर यांचा सत्कार माननीय मुख्याध्यापक सर यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी शाळेच्या पहिल्या एस.एस.सी. बॅचचे विद्यार्थी सुशील मालुंजकर (शाळेचा पहिला विध्यार्थी व उद्योजक), प्रो. सौ. सोनाली घोलप (नगरसेवका, पिंपरी चिंचवड), गणेश सातव (जॉब मॅनेजर, कमिन्स), धानिष शेख (प्रॉपर्टी मॅनेजर मलबार हिल), महेश अंधलकर (इक्सएकटीव्ह सप्लाय डेव्हलोपमेंट), राजू मेहता (प्रो. नवकार ज्वेलर्स), निखिल सोनार (सिनियर जनरल मॅनेजर रिलायन्स इंडस्ट्रिस), रणजित मंडल (प्रो. सम्राट इंडस्ट्रिस , रोहन बोहिते (मॅनेजर पृडेंट इन्शुरन्स) ,सागर कामते (डायरेक्टर स्काय हिरिंगमेट), स्नेहल कुंभारकर (नुट्रीशनलिस्ट व डाएट कन्सल्टन्ट) विशेष उपस्थित होते. निरोप समारंभाच्या निमित्ताने इयत्ता दहावीतील सर्व विद्यार्थ्यांचा रौप्य महोत्सवी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. हे स्मृतिचिन्ह प्रेम व कृतज्ञतेचे प्रतीक होते.

हेही वाचा –  शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर, खात्यात येणार थेट 4000 रुपये, महत्त्वाची अपडेट समोर!

कार्यक्रमादरम्यान इयत्ता दहावीच्या कु. जोहरा मोकाशी, कु. नूतन भारथ आणि कु. अक्षरा अकांगिरे या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी शाळेतील आठवणी सांगून शिक्षकांप्रती व शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

शिक्षकांचे मनोगत सौ. मंजुषा वाळवेकर मॅडम यांनी व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री. ढोकळे सर यांनी प्रेरणादायी भाषण केले. आमचे लाडके मुख्याध्यापक श्री. शिवलिंग ढवळेश्वर सर यांनीही विद्यार्थ्यांना एस.एस.सी. परीक्षेसाठी व भावी आयुष्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच पहिल्या एस.एस.सी. बॅचमधील काही विद्यार्थ्यांनीही आपले अनुभव सांगून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.

या प्रसंगी सर्व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. कार्यक्रमाची सांगता कृतज्ञता प्रार्थनेने करण्यात आली. औपचारिक कार्यक्रमानंतर इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी एस.एस.सी. विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक खेळांचे आयोजन केले, ज्यामुळे कार्यक्रम अधिक आनंददायी व संस्मरणीय ठरला. सर्व विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.
हा कार्यक्रम माननीय मुख्याध्यापिका सुनिता ढवळेश्वर मॅडम, व्यवसाहिक श्री. शिंगारे सर, पहिल्या बॅचचे विध्यार्थी, पालक, पालक-शिक्षक संघांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पार पडला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

हा निरोप समारंभ आनंदी तसेच भावनिक वातावरणात संपन्न झाला आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील नवीन पर्वासाठी गोड आठवणी देऊन गेला. “शिक्षणाचे हे पाऊल फक्त सुरुवातीचे होते, आता आयुष्याच्या मोठ्या परीक्षेत अव्वल या. खूप खूप शुभेच्छा!”

– प्रमोद शिंदे संत साई हायस्कूल, भोसरीशिक्षक प्रतिनिधी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button