हार्दिक मुंबई इंडियन्स सोडणार; सीएसकेसह ७ फ्रँचायझींमध्ये खरेदीसाठी चुरस, ‘हे’ दोन संघ कर्णधारपद देण्यास सज्ज

Hardik Pandya MI Leaving CSK KKR RR Trade Rumors IPL 2027 : आयपीएल २०२७ च्या हंगामापूर्वी क्रिकेट जगतातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या आगामी हंगामापूर्वी मुंबईची साथ सोडण्याची दाट शक्यता आहे. आयपीएल २०२६ चा हंगाम संपल्यानंतर मुंबई इंडियन्स आणि हार्दिक यांच्याकडून मिळणारे संकेत या चर्चांना दुजोरा देत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, हार्दिकला ‘ट्रेड डील’ (अदलाबदल) द्वारे दुसऱ्या संघात पाठवले जाऊ शकते. विशेष म्हणजे, हार्दिकला आपल्या ताफ्यात सामील करून घेण्यासाठी तब्बल ७ फ्रँचायझींमध्ये जोरदार चुरस सुरू झाली असून यामध्ये आता चेन्नई सुपर किंग्सचाही (CSK) समावेश झाला आहे.
आरसीबी आणि हैदराबाद वगळता ७ फ्रँचायझी शर्यतीत!
‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या एका अहवालानुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) या दोन फ्रँचायझी वगळता, आयपीएलमधील उर्वरित नऊपैकी सात फ्रँचायझींनी हार्दिकला करारबद्ध करण्यात रस दाखवला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत चेन्नई सुपर किंग्सने हार्दिकला संघात घेण्यात रस नसल्याचे म्हटले होते; मात्र आता सीएसकेनेही या शर्यतीत उडी घेतली आहे.
असे असले तरी, हार्दिकला आपल्या संघात घेण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स (RR) हे दोन संघ सर्वाधिक उत्सुक आहेत. हे दोन्ही संघ हार्दिकला थेट कर्णधारपद सोपवण्यासही तयार आहेत. केकेआरला सध्या एका हुकमी कर्णधाराची गरज आहे, तर राजस्थानमध्ये सध्या रियान परागकडे कमान आहे, पण हार्दिक आल्यास नेतृत्व त्याच्याकडे सोपवले जाईल.
हेही वाचा – टोमॅटोचे आरोग्यदायी फायदे
असे असले तरी, हार्दिकला आपल्या संघात घेण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स (RR) हे दोन संघ सर्वाधिक उत्सुक आहेत. हे दोन्ही संघ हार्दिकला थेट कर्णधारपद सोपवण्यासही तयार आहेत. केकेआरला सध्या एका हुकमी कर्णधाराची गरज आहे, तर राजस्थानमध्ये सध्या रियान परागकडे कमान आहे, पण हार्दिक आल्यास नेतृत्व त्याच्याकडे सोपवले जाईल.
चेन्नई सुपर किंग्सला हार्दिक पंड्याला संघात घेण्यात रस असला, तरी ते त्याला कर्णधारपदाची हमी देणार नाहीत; कारण सध्या ऋतुराज गायकवाडकडे चेन्नईचे नेतृत्व आहे. यापूर्वी आयपीएल २०२६ पूर्वी सीएसकेने रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांच्या बदल्यात राजस्थानकडून ट्रेडद्वारे संजू सॅमसनला संघात घेतले होते, तेव्हाही त्याला कर्णधारपदाचे आश्वासन दिले नव्हते.
मात्र, हार्दिक चेन्नईत जाण्यामागे महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) हे मोठे कारण असू शकते. हार्दिक आणि धोनीमधील मैत्रीचे नाते जगजाहीर आहे. धोनी गेल्या हंगामात दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्यामुळे हार्दिकच्या रूपाने सीएसकेला केवळ एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूच मिळणार नाही, तर धोनीची जागा घेऊ शकणारा एक तगडा ‘फिनिशर’ आणि अनुभवी मार्गदर्शकही मिळेल.





