पिंपरी-चिंचवडमधील माजी सैनिकांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध!
भाजपा नेते आमदार महेश लांडगे यांची भावना

दिघीतील माजी सैनिक विकास संघासाठी 10 संगणक भेट
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
दिघी येथील माजी सैनिक विकास संघासाठी भाजपा नेते तथा भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्याकडून दहा संगणक भेट देण्यात आले आहेत. माजी सैनिक विकास संघातर्फे अभ्यासिका चालवली जाते. या अभ्यासिकेला आमदार लांडगे यांनी भेट दिली होती यावेळी अभ्यासिकेसाठी संगणक देण्यात येतील असे शब्द आमदारांनी दिला होता तो शब्द त्यांनी पूर्ण केला. याशिवाय माजी सैनिकांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध असल्याची भावना यावेळी आमदार लांडगे यांनी व्यक्त केली आहे.
दिघी येथे मोठ्या प्रमाणात माजी सैनिक वास्तव्याला आहेत. या माजी सैनिकांच्या माध्यमातून माजी सैनिक विकास संघ कार्यरत आहे. या विकास संघा तर्फे अभ्यासिका चालवली जाते या अभ्यासिकेचे कामकाज पाहण्यासाठी भाजप नेते तथा भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी अभ्यासिकेची पाहणी केली येथील कामकाजाचा आढावा घेतला यानंतर या संघासाठी संगणकाची गरज आहे हे लक्षात आल्यानंतर आमदार महेश लांडगे यांनी या पदाधिकाऱ्यांना संगणक देण्याचे आश्वासन दिले होते त्याप्रमाणे त्यांनी लेनोवो कंपनीचे ऑल-इन-वन (हाय कन्फिगरेशन) 10 संगणक भेट दिले आहेत.
हेही वाचा : बंगालच्या वादळाने महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत पाऊस पडणार; हवामान खात्याचा इशारा
यावेळी माजी नगरसेवक विकास डोळस, कुलदीप परांडे, माजी सैनिक विकास संघाचे अध्यक्ष कॅप्टन नरेंद्र सिंह चव्हाण, उपाध्यक्ष भिसे, भास्कर आंब्रे, तसेच अन्य माजी सैनिक उपस्थित होते. यावेळी माझी सैनिक विकास संघाच्या वतीने आमदार महेश लांडगे यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांचे आभारही मानले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
देशाच्या संरक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या, घरावर तुळशीपत्र ठेवत आपल्या तमाम देशवासियांच्या संरक्षणाची जबाबदारी खांद्यावर घेणारे सैनिक आमच्यासाठी आदर्श आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी या भागात माजी सैनिकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. ही खरे तर आपल्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. या माजी सैनिकांना कोणतीही अडचण येऊ नये. यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. त्यांच्या हितासाठी सदैव दक्ष राहणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.