बंगालच्या वादळाने महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत पाऊस पडणार; हवामान खात्याचा इशारा

पुणे | महाराष्ट्रात सध्या उन्हाचा तडाखा आहे, पण बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे काही भागांमध्ये पुढील दोन दिवसांत पावसाचा अंदाज आहे. राज्यातील तापमान येणाऱ्या तीन दिवसांत वाढेल अशी शक्यता आहे. मुंबई, नाशिक, पुणे आदी शहरांमध्ये तापमानात वाढ झाली आहे. उष्णतेपासून बचाव करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. देशातील अनेक भागातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई, नाशिक, पुणे, संभाजीनगर, अमरावती, यवतमाळसह काही जिल्ह्यांत तापमानात सरासरीपेक्षा २ ते ४ अंशांनी वाढ झाली आहे. उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्रात पोहोचू न शकल्याने रात्रीच्या थंडीचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे राज्यातील उच्चतम तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत असून उष्णतेपासून बचाव करण्याचा, तसेच योग्य काळजी घेण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे.
हेही वाचा : ..म्हणून मला हलक्यात घेऊ नका; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना इशारा
बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात चक्रीवादळ तयार होत आहे. त्यामुळे देशातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांत पावसाची शक्यता आहे. २३ फेब्रुवारीपर्यंत उत्तर भारतातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.