काव्या मारनचा LIVE सामन्यात संताप! कृणाल पांड्याच्या बॉलिंग ॲक्शनवर थेट गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

Kavya Maran Questions Krunal Pandya Bowling Action : सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन हिने कृणाल पांड्याच्या गोलंदाजी अॅक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा 55 धावांनी पराभव केला. मात्र या विजयासहही हैदराबादला टॉप-2 मध्ये स्थान मिळवता आले नाही.
शुक्रवारी झालेल्या या सामन्यात हैदराबादने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याने या सामन्यात फक्त 2 षटके टाकली. त्याने 12 च्या इकॉनॉमीने 24 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतली. मात्र त्याच्या गोलंदाजी अॅक्शनवर काव्या मारनने संशय व्यक्त केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये काव्या मारन कृणालची गोलंदाजी चकिंग असल्याचे म्हणत असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडीओमध्ये तिचा आवाज ऐकू येत नसला तरी तिच्या ओठांच्या हालचालींवरून ती गोलंदाजी अॅक्शनवर नाराजी व्यक्त करत असल्याचे दिसत आहे. क्रिकेटमध्ये चकिंग म्हणजे नियमबाह्य गोलंदाजी मानली जाते.
हेही वाचा – असा नाश्ता ज्यामुळे तुम्हाला कधीच भासणार नाही, डॉक्टरांची गरज, जाणून घ्या कोणते आहे ‘ते’ पदार्थ
हेनरिक क्लासेन नवव्या षटकात फलंदाजीला आल्यानंतर कृणाल पांड्याला गोलंदाजी देण्यात आली. पहिल्याच षटकात त्याला एक षटकार बसला आणि त्याने 8 धावा दिल्या. त्यानंतर त्याला गोलंदाजीवरून हटवण्यात आले. नंतर 17वे षटक टाकताना त्याने अर्धशतक झळकावलेल्या क्लासेनला बाद केले. मात्र त्याच षटकात नितीश कुमार रेड्डीने सलग दोन षटकार ठोकले. या षटकातील शेवटच्या चेंडूनंतर काव्या मारनची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली आणि त्यानंतर हा वाद पेटला.
दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने प्लेऑफमधील आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. मात्र संघाला टॉप-2 मध्ये प्रवेश मिळवता आला नाही. त्यामुळे आता एसआरएचला एलिमिनेटर सामना खेळावा लागणार आहे. या सामन्यात त्यांचा सामना कोणत्या संघाशी होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. यापैकी पात्र ठरणारा संघ 27 मे रोजी एसआरएचविरुद्ध एलिमिनेटरमध्ये भिडणार आहे.





