Breaking-newsपिंपरी / चिंचवड

सफाई कार्मचारी महिला भगिनींना इरफानभाई सय्यदा यांच्याकडून अनोखी ओवाळणी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत सफाई कर्मचारी महिला संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात स्वच्छतेचे काम करतात. त्यांच्यामुळेच खरे तर शहरातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहते. अशी भावना व्यक्त करत रक्षाबंधन सणानिमित्त कामगार नेते तथा शिवसेना सहसंपर्कप्रमुख इरफानभाई सय्यद यांनी संबंध सफाई कर्मचारी महिला भगिनींना ‘आरोग्य सुरक्षा संच’ भेट दिला आहे.         

सफाई कर्मचारी महिला वर्गाला पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून स्वच्छतेचे साहित्य दिले जात नाही. त्यांना हॅण्डग्लोज दिले जात नाहीत. कोरोना परिस्थितीचा अपवाद वगळता त्यांना मास्क दिले जात नाहीत. अशा परिस्थितीत महिला सफाई कामगारांना शहरातील विविध भागात जाऊन रस्ते सफाई काम करावे लागते. लोकांनी टाकलेला ओला-सुका कचरा विलगीकृत करून घंटागाडीमध्ये टाकावा लागतो. अशा परिस्थितीत महिला कामगारांच्या आरोग्याचा विचार केला जातन नाही. कोरोनाच्या धोकादायक परिस्थितीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगार आपले कर्तव्य बजावतात. त्यांच्या कार्याबद्दल कामगार नेते इरफानभाई सय्यद यांनी आदरभाव व्यक्त केला आहे.

‘’सावित्रीची लेक तू… आत्मसन्मानाची ज्योत… हाती घेवुन अडथळ्यांना लाथाडुन… सदैव पुढे जा तू…!’’ अशा शब्दांत सय्यद यांनी सफाई कामगार महिलांप्रती बंधुभावाची भावना व्यक्त केली आहे. आज रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने त्यांनी महिला भगिनींना ‘आरोग्य सुरक्षा संच’ भेट दिला. रक्षाबंधन सणाची ही एकप्रकारची ओवाळणीच इरफानभाईंनी महिला भगिनींना दिली आहे. आपला भाऊ पाठिशी असल्याने महिला भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button