राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांचे उत्तर; म्हणाले, “त्यांची असूया एवढीच असावी”
“ठाकरेांच्या टीकेवर फडणवीस म्हणाले, ‘ज्यांना निमंत्रण मिळालं नाही त्यांना वाईट वाटतंय..!
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यावर केलेल्या टीकेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत मोहन भागवत यांच्या भाषणावर टीका केली होती. भागवत यांनी मुंबईत आयोजित व्याख्यानमालेत भाषेवरून वाद घालण्याबाबत भाष्य केले होते. मनसे प्रमुखांनी त्यांच्या पोस्टमध्ये सरसंघचालकांची भूमिका खोडून काढत तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला होता. तसेच, संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवर मोदी सरकारच्या भीतीमुळे उपस्थित राहिले असल्याचेही ठाकरे म्हणाले होते.
यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “ज्या लोकांना निमंत्रण मिळालं नाही, त्यांना वाईट वाटतंय आणि म्हणून ज्यांना निमंत्रण मिळालं त्यांच्यावर टीका करत आहेत. मला असं वाटतं की संघाचे १०० वर्ष पूर्ण झाले आहेत, आणि शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लोकांना स्पष्ट माहिती मिळावी, प्रश्न मिटावेत. यासाठी समाजातील विविध क्षेत्रांतील, विविध जातीसमाजातील आणि विविध उद्योगांतील लोकांना कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आले होते. बहुतांश लोकांचा संघाशी पूर्वी संबंध आलेला नाही.”
फडणवीसांनी असेही नमूद केले की, संघविरोधी प्रचार करणाऱ्यांच्या दुकानांवर परिणाम होतो आहे, त्यामुळे काही लोकांत तळमळ निर्माण झाली आहे. त्यांनी स्पष्ट केले, “दोन दिवस सरसंघचालकांनी फक्त मार्गदर्शनच केलं नाही, तर आलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं. त्यामुळे संघविरोधी प्रचार करणाऱ्यांच्या दुकानं बंद होणार आहेत, यामुळे अनेकांना तळमळ आणि मळमळ वाटतेय. त्यामुळे बोलणाऱ्या लोकांना त्यांच्या असूया एवढीच असावी की आम्हाला का बोलवलं नाही?”




