डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचा प्लेसमेंटमध्ये दबदबा
शिक्षण विश्व: विद्यार्थ्यांना १५ लाखांपर्यंत वार्षिक पॅकेज

पिंपरी- चिंचवड | गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्यविकास आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाच्या बळावर डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल, आकुर्डीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्लेसमेंटच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड होत असून, यंदा विद्यार्थ्यांना सरासरी ६ ते १५ लाख रुपयांपर्यंत वार्षिक पॅकेज मिळाले आहे.
संकुलातील इंजिनिअरिंग, फार्मसी, एमबीए, एमसीए, पीजीडीएम तसेच पॉलिटेक्निक विभागातील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. विशेषतः सायबर सिक्युरिटी, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि डेटा अॅनालिटिक्स यांसारख्या कौशल्याधारित क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. गतवर्षी संकुलातील विद्यार्थ्यांनी तब्बल २७ लाख रुपये वार्षिक (LPA) चे सर्वोच्च पॅकेज मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला होता. त्या यशाची परंपरा यंदाही कायम राखण्यात संकुलाला यश आले आहे.
व्होडाफोन, दीपक फर्टिलायझर्स, बीएनवाय मेलॉन, कॅपजेमिनी, फोर्स मोटर्स, विप्रो, डसॉल्ट सिस्टिम्स, गोदरेज, सुल्झर, किर्लोस्कर, बॉश, एचएसबीसी टेक्नॉलॉजी, इन्फोब्लॉक्स, आरटीकॅम्प, पॉलीकॅब आणि ह्युंदाई इंडिया यांसारख्या प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या मुलाखती यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी देश-विदेशातील करिअरच्या नव्या संधी खुल्या झाल्या आहेत.
हेही वाचा
भारताची अंतराळात ऐतिहासिक झेप! स्कायरूटच्या पहिल्या ‘विक्रम-१’ रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण
विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाच्या गरजा आणि आधुनिक भरती प्रक्रियेची ओळख व्हावी, यासाठी संकुलाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अभियांत्रिकी, एमबीए आणि पीजीडीएम विभागातील विद्यार्थ्यांसाठी नुकतेच ‘एचआर सिम्पोजियम’चे आयोजन करण्यात आले होते. कॉर्पोरेट क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी विद्यार्थ्यांना कौशल्याधारित भरती प्रक्रिया, करिअर नियोजन, व्यक्तिमत्त्व विकास आणि प्रभावी मुलाखत तंत्र याबाबत मार्गदर्शन केले.
उत्कृष्ट प्लेसमेंटची उज्ज्वल परंपरा…
अत्याधुनिक प्रयोगशाळा, जागतिक दर्जाच्या सुविधा, अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन, माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य तसेच उद्योगाभिमुख इंटर्नशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर संकुलाचा भर असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, ट्रस्टी तेजस पाटील, कॅम्पस संचालक रिअर अॅडमिरल अमित विक्रम (निवृत्त), डीन प्लेसमेंट्स प्रा. जस्मिता कौर, सर्व प्राचार्य, विभागप्रमुख आणि प्राध्यापक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. “विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना यशाचे पंख देत, गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्यविकास आणि उत्कृष्ट प्लेसमेंटची उज्ज्वल परंपरा जपणारे संकुल म्हणजे डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल, आकुर्डी,” असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.





