भारताची अंतराळात ऐतिहासिक झेप! स्कायरूटच्या पहिल्या ‘विक्रम-१’ रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण

Vikram 1 Rocket Launch | हैदराबादमधील स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीने शनिवारी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ऑर्बिटल-क्लास रॉकेट ‘विक्रम-१’ यशस्वीरीत्या प्रक्षेपित केलं. ऑर्बिटल-क्लास रॉकेट ‘विक्रम-१ हे भारताचं पहिलं खाजगीरित्या विकसित केलेलं रॉकेट आहे. या अभियानाला ‘आगमन’ असं नाव देण्यात आलंय.
१८ जुलै, शनिवारी ढगाळ हवामानात स्कायरूट विक्रम-१ च्या पहिल्या ऑर्बिटल प्रक्षेपणासाठी सज्ज झालं होतं. रॉकेटचं उड्डाण सुरुवातीला सकाळी साडेअकरा वाजता होणार होतं, परंतु ते पुढे ढकलून दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी करण्यात आलं. स्कायरूटने सांगितलं की, “काल रात्रीच्या सर्व उड्डाणपूर्व चाचण्या आणि आज सकाळचं हवामान अनुकूल होतं. परंतु, यामध्ये एक नियोजित थांबा घेण्यात आला.
#WATCH | Andhra Pradesh: India’s first privately developed orbital-class rocket, Vikram-1, launched from the Satish Dhawan Space Centre in Sriharikota
Built by Hyderabad-based Skyroot Aerospace, Vikram-1 is powered by three solid-fuel stages and a liquid orbital adjustment… pic.twitter.com/QQC9CPjcxH
— ANI (@ANI) July 18, 2026
हेही वाचा
संघटनात्मक बळकटीसाठी पिंपरी-चिंचवड भाजपाची उद्या महत्त्वाची जिल्हा बैठक
या मोहिमेचा उद्देश विक्रम-१ ची कामगिरी आणि त्यामधील प्रमुख तंत्रज्ञानाची उड्डाणादरम्यान पडताळणी करणे हा आहे. स्कायरूटच्या मते, या चाचणीतून मिळणारा डेटा भविष्यातील मोहिमांना अधिक सुधारेल आणि नियमित प्रक्षेपण सुरू करण्यास मदत करेल. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी स्कायरूटने भारतीय भूमीवरून अंतराळात पोहोचणारे पहिलं खाजगी रॉकेट विक्रम-एस यशस्वीरीत्या प्रक्षेपित केलं होतं; त्यानंतर जवळपास तीन वर्षांनी ही नवी कामगिरी झाली आहे.
विक्रम-१ काय आहे?
विक्रम-१ हे २४ मीटर उंच, तीन टप्प्यांचं ऑर्बिटल लाँच व्हीकल आहे. हे रॉकेट ३५० किलो वजनापर्यंतचे पेलोड्स ६०-डिग्री झुकलेल्या ४५० किमीच्या लो अर्थ ऑर्बिटमध्ये नेण्यास सक्षम आहे. या पहिल्या मोहिमेत एक ‘ऑर्बिटल ॲडजस्टमेंट मॉड्युल’ देखील समाविष्ट आहे, जे प्रक्षेपणानंतर उपग्रहांना त्यांच्या नियुक्त कक्षेत स्थापित करू शकतं.





