ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संघटनात्मक बळकटीसाठी पिंपरी-चिंचवड भाजपाची उद्या महत्त्वाची जिल्हा बैठक

पदाधिकाऱ्यांना उपस्थितीचे आवाहन, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन

शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची माहिती, प्रदेशातील मान्यवर नेत्यांची उपस्थिती

पिंपरी-चिंचवड | भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याची अत्यंत महत्त्वाची जिल्हा बैठक रविवार, दि. 19 जुलै 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता कासारवाडी येथील हॉटेल कलासागर येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती भाजपा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी दिली.

या बैठकीत भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण हे प्रमुख मार्गदर्शन करणार असून, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील हेही उपस्थित राहणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, संघटनात्मक बांधणी, बूथस्तरावरील नियोजन तसेच पक्षाच्या विविध उपक्रमांबाबत या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे.

बैठकीस भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस राजेश पांडे आणि निरंजन डावखरे, पश्चिम महाराष्ट्राचे संयोजक विक्रम पावसकर तसेच पिंपरी-चिंचवड जिल्ह्याचे प्रभारी भरत नाना पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

हेही वाचा

सांगवी दापोडीतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेची युद्धपातळीवर उपाययोजना

कोअर समितीचे सदस्य, सर्व आजी-माजी खासदार व आमदार, राज्य परिषदेचे सदस्य, सर्व जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक, माजी नगरसेवक, मनपा निवडणूक इच्छुक उमेदवार, मोर्चे, आघाडी, प्रकोष्ठ व सेलचे अध्यक्ष, मंडल अध्यक्ष, विधानसभा बीएलए-1 तसेच पदवीधर व शिक्षक नोंदणी प्रमुख यांनी बैठकीस पूर्णवेळ उपस्थित राहावे, असे आवाहनही शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी केले आहे.

“पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी तसेच आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने व कार्यकर्त्याने या बैठकीत सहभागी होऊन संघटनात्मक जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडावी,” असे शत्रुघ्न (बापू) काटे यांनी म्हटले आहे.

“भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बांधणीसाठी आणि आगामी राजकीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर ही जिल्हा बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्याने बैठकीस पूर्णवेळ उपस्थित राहून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी योगदान द्यावे. संघटनात्मक कामगिरी आणि बूथस्तरावरील सक्षमीकरणावर या बैठकीत विशेष भर दिला जाणार आहे.”

– श्री शत्रुघ्न (बापू) काटे, जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा. 

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button