breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘देशात पेट्रोलचे दर १५ रूपये प्रतिलीटर होऊ शकतात’; नितीन गडकरींचा मोठा दावा

मुंबई : महागाईमुळे सर्वासामान्य दनता त्रस्त झाली आहे. इंधनाच्या दरातही वारंवार वाढ होत आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इंधनाच्या किंमतीबाबत मोठा दावा केला आहे. देशात पेट्रोलचे दर १५ रूपये प्रतिलीटर होऊ शकतात, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते राजस्थानमधील एका कार्यक्रमात बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले की, ६० टक्के इथेनॉल आणि ४० टक्के वीज वापरल्यास पेट्रोलची किंमत प्रतिलीटर १५ रूपयांपर्यंत कमी होऊ शकते. यामुळे देशातील इंधनाची आयातही कमी होईल आणि पैसा सरकारकडे जाईल. हा निधी शेतकऱ्यांसाठी वापरता येऊ शकतो. शेतकरी आता केवळ अन्नदाता नाही, तर ऊर्जा दाताही बनेल. ऑगस्ट महिन्यात टोयोटा कंपनीची वाहने लाँच करण्यात येणार आहेत. ही सर्व वाहने शेतकऱ्यांनी तयाक केलेल्या इथेनॉलवर चालतील. ६० टक्के इथेनॉल आणि ४० टक्के वीज, त्याची सरासरी पकडली तर पेट्रोलची किंमत १५ रूपये प्रतिलीटर होईल.

हेही वाचा – राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार? मनसेचा ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव?

सरासरी ६० टक्के इथेनॉल आणि ४० टक्के वीजेचा वापर केल्यास पेट्रोल १५ रूपये प्रतिलीटर दराने मिळेल आणि लोकांना त्याचा फायदा होईल. सध्या देशात मोठ्या प्रमाणात इंधनाची आयात करावी लागत आहे. भारतात इंधनाची आयात १६ लाख कोटी रूपयांची आहे. ही आयात कमी केल्यास हा पैसा परदेशात जाण्याऐवजी शेतकऱ्यांच्या घरी जाईल. उसापासून इथेनॉलची निर्मिती केली जाते आणि भारतात लाखो ऊस उत्पादक शेतकरी आहेत, ज्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन हे आहे. त्यामुळे असं झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, असंही नितीन गडकरी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button